मोठी बातमी! बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 17 नगरपरिषदांवर 'महिला राज, आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.
मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.दरम्यान, ३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. मिनी विधानसेवर यावेली महिलाराज येणार आहे.
advertisement
३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर -
- देऊळगावराजा - महिला प्रवर्ग आरक्षित
- मोहोळ - महिला प्रवर्ग आरक्षित
- तेल्हारा - महिला प्रवर्ग आरक्षित
- ओझर - महिला प्रवर्ग आरक्षित
- वानाडोंगरी - महिला प्रवर्ग आरक्षित
- भुसावळ - महिला प्रवर्ग आरक्षित
- घुग्गूस - महिला प्रवर्ग आरक्षित
- चिमूर - महिला प्रवर्ग आरक्षित
- शिर्डी - महिला प्रवर्ग आरक्षित
- सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
- मैनदर्गी - महिला प्रवर्ग आरक्षित
- दिगडोहदेवी - महिला प्रवर्ग आरक्षित
- दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
- अकलूज - महिला प्रवर्ग आरक्षित
- बीड - महिला प्रवर्ग आरक्षित
- शिरोळ - महिला प्रवर्ग आरक्षित
advertisement
राज्यातील दीर्घकाळ रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका अवघ्या तोंडावर आल्या आहेत. रखडलेल्या या महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील राजकीय कार्यकर्त्यांना कंबर कसली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 17 नगरपरिषदांवर 'महिला राज, आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी