Shiv Sena UBT MLA : ठाकरे-शिंदेंचे शिलेदार नडले, वरुण सरदेसाईंच्या प्रश्नाने विधानसभेतलं वातावरण तापलं

Last Updated:

Shiv Sena UBT vs Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने सभागृहात ठाकरे आणि शिंदे यांचे आमदार एकमेकांना नडले.

शिंदे-ठाकरेंचे शिलेदार नडले, वरुण सरदेसाईंच्या प्रश्नाने विधानसभेतलं वातावरण तापलं
शिंदे-ठाकरेंचे शिलेदार नडले, वरुण सरदेसाईंच्या प्रश्नाने विधानसभेतलं वातावरण तापलं
राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत पावसाने आज चांगलाच जोर धरल्याने वातावरणात गारवा असला तरी विधानसभेतील वातावरण मात्र चांगलंच गरम झालं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने सभागृहात ठाकरे आणि शिंदे यांचे आमदार एकमेकांना नडले. वाद शांत होत नसल्याने अखेर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेत आज कामकाजा दरम्यान वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील वांद्रे परिसरात 42 एकर जमीन ही संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. या ठिकाणच्या विकासावरून सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या उत्तरावर सरदेसाई आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. सरदेसाई यांनी टिप्पणी करताना मंत्र्‍यांना व्यवस्थित ब्रीफिंग झाली नसल्याचे म्हटले. त्यानंतर शंभूराद देसाई यांनी मविआ सरकारच्या कारभारावर टीका करताना 2019 ते 2022 या दरम्यान एकही बैठक पार पडली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मंत्र्‍यांकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने ठाकरे गट आणखीच आक्रमक झाला.
advertisement
वाद सुरू असताना दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली.  या ठिकाणी वरुण सरदेसाई यांनी प्रश्न विचारला, त्यावर मंत्री ब्रिफींग घेउन आले. सरकारला लाज आहे का हे बोलायचे काय कारण, तुम्ही जन्मताच हुशार आहे का असा सवाल केला. गुलाबराव पाटील यांच्या आक्रमकेनंतर गदारोळ आणखीच वाढला.
advertisement
शंभुराज देसाई पुन्हा म्हटले की, शंभूराज देसाई म्हणाले की, मला यात अधिक खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रीफिंग आहे. मला नम्रपणे सांगायचे आहे की 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
advertisement
2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमचे लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले. जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
advertisement
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. चुकीची उत्तरं देत आहेत म्हणून हक्कभंग आणायचा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भास्कर जाधव यांनी शंभूराज देसाई हे कसे उत्तर देत आहेत, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. शंभूराज यांच्या अख्त्यारीत नाही,
कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही खात्याबाबत बोलता येत नाही. सभागृहाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. शंभुराज देसाई नगरविकास खात्याच्या प्रश्नांवर कसे बोलू शकतात. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले होते का? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला. यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. अखेर कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
advertisement
आमदार भातकळकरांनी आपल्या स्थानिक मतदारसंघातही हाच प्रश्न उद्धवला असल्याचे म्हटले. या प्रश्नांमुळे माझा ही मतदारसंघ बाधित आहे. त्या जागेवर झोपडपट्टी झाल्या आहेत. ⁠यावर मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. ⁠धारावी पुनर्विकासासाठी जर रेल्वेची जागा घेतली आहे तर त्याला विरोध का? असा सवाल त्यांनी केला.
या प्रश्नांमुळे माझा ही मतदारसंघ बाधित आहे. त्या जागेवर झोपडपट्टी झाल्या आहेत. ⁠यावर मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. ⁠धारावी पुनर्विकासासाठी जर रेल्वेची जागा घेतली आहे तर त्याला विरोध का? असा प्रश्न केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MLA : ठाकरे-शिंदेंचे शिलेदार नडले, वरुण सरदेसाईंच्या प्रश्नाने विधानसभेतलं वातावरण तापलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement