पहिल्या अर्ध्या तासांत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? राज्यभरातले निकाल एका क्लिकवर....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagar Parishad And Nagar Panchayat Election Results: २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले तर २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी शनिवारी मतदान झाले. आज राज्यातील सर्वच ठिकाणी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
Nagar Parishad And Nagar Panchayat Election Results: राज्यातील २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले तर २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी शनिवारी मतदान झाले. आज राज्यातील सर्वच ठिकाणी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
बारामती नगरपरिषद मतमोजणी- पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव आघाडीवर.
पहिल्या फेरीत सावंतवाडीत भाजपचे नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले 324 मतांनी आघाडीवर
सिल्लोडमध्ये समीर अब्दुल सत्तार पोस्टल मतमोजणीत आघाडीवर, अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आघाडीवर
बीड जिल्ह्यातून पहिला निकाल हाती, माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी, प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव विजयी
advertisement
वडगाव मावळ नगरपंचायत पहिला निकाल हाती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल ढोरे एक मताने निवडून आले.
बीड जिल्ह्यातून पहिला निकाल हाती- माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी, प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव विजयी
बार्शी नगरपरिषद- प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 अशा दोन्ही प्रभागातून भाजपाचे 4 उमेदवार विजयी
advertisement
नांदेड जिल्ह्यातील मूदखेड नगर परिषदेत प्रभाग क्रमांक दोनमधून काँगेसचे दोन नगरसेवक विजयी
बीड नगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे नितीन साखरे आणि शुभम धूत विजयी
जव्हार नगर परिषद पहिली फेरी- भाजपा ४, राष्ट्रवादी अजित पवार १, शिवसेना शिंदे १ विजयी
पैठण निकाल- प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी, संगीता मापारी आणि सुनील रासने विजयी
advertisement
परतूर नगरपालिका निकाल: भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या प्रियांका राक्षे दोन हजार मताच्या आघाडीवर
छत्रपती संभाजी नगर नगराध्यक्षपदासाठी कोण कोण आघाडीवर?
एकूण जागा : ७
सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर पोस्टल
कन्नड : काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर
पैठण : उबठा च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
गंगापूर : भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर
खुलताबाद : भाजप परशराम बारगळ आघाडीवर
advertisement
वैजापूर : पोस्टल मतमोजणीत भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
फुलंब्री (पंचायत) : भाजप सुहास शिरसाठ आघाडीवर
जळगावमध्ये काय परिस्थिती?
चाळीसगाव नगर परिषद- भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण टपाली मतदानात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाचोरा नगरपरिषद मतमोजणी- शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील टपाली मतांच्या मतमोजणीत आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे.
advertisement
कणकवली निकाल- भाजपचा पहिला विजय, प्रभाग १ मध्ये भाजपचे राजेश राणे विजयी
संगमनेर नगरपालिका- नगराध्यक्षपद
मैथीली तांबे - संगमनेर सेवा समीती (थोरात-तांबे गट) 770 मतांनी आघाडीवर, सुवर्णा खताळ- शिवसेना पिछाडीवर, संगमनेर सेवा समितीचे दोन नगरसेवक विजयी
मालवण नगर परीषद निवडणूक मतमोजणी
view commentsममता वराडकर (नगराध्यक्ष उमेदवार शिंदे गट ) 172 मतांनी पुढे ममता पराडकर 981 मते, म्हणजेच 172 मतांची आघाडी, कुणाला किती मते? शिल्पा खोत 809 (भाजप), पूजा करलकर 689 ( ठाकरेंची शिवसेना)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 10:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पहिल्या अर्ध्या तासांत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? राज्यभरातले निकाल एका क्लिकवर....










