Maharastra Politics : 'संजय राऊतांना घरात घुसून मारू', शिवसेना आमदार राजेश मोरेंची थेट धमकी!

Last Updated:

Rajesh More On Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाते आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना थेट धमकी दिली आहे. राजेश मोरे काय म्हणालेत? पाहा

News18
News18
Maharashtra Politics : आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते जिल्हाप्रमुख होते, बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केल्यानंतर मोठा वाद पेटला होता. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना थेट धमकी दिल्याचं पहायला मिळतंय. 'संजय राऊत यांना घरात घुसून मारू,' अशी जाहीर धमकी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्यावर 'भड**गिरी' करत असल्याचा आणि त्यांनी शरद पवार यांच्याकडून 'सुपारी' घेतल्याचा आरोपही मोरे यांनी केला आहे.
राजेश मोरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, 'संजय राऊत भडवेगिरीचे काम करत आहेत. शिवसैनिक त्यांना घरात घुसून मारल्याशिवाय शांत बसणार नाहीत.' आनंद दिघे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या कथित चुकीच्या वक्तव्याबद्दलही त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत राजेश मोरे यांनी राऊतांना राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलनही केले. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. 'संजय राऊत यांनी चर्चेचा विषय घ्यावा, डिबेट ठेवावे, आम्ही शिवसैनिक येतो,' असे खुले आव्हानही आंदोलकांनी दिले आहे.
advertisement

कोण आहेत राजेश मोरे?

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन एकमेव आमदार राजू पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांची जागा निवडून येणार अशी सर्वांना खात्री होती. मात्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी इथे स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घेत विजय खेचून आणला असे बोलले जाते. त्यामुळे राजेश मोरे जायंट किलर ठरले होते. मोरे यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharastra Politics : 'संजय राऊतांना घरात घुसून मारू', शिवसेना आमदार राजेश मोरेंची थेट धमकी!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement