ऐन दिवाळीत तीन राजकीय नेते हरपले, शिवाजीराव कर्डीलेनंतर शरद पवार गटाच्या माजी आमदाराचं निधन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
यंदाची दिवाळी राजकीय वर्तुळासाठी अत्यंत दु:खद राहिली आहे. मागील चार दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणाला तीन मोठे धक्के बसले आहेत.
यंदाची दिवाळी राजकीय वर्तुळासाठी अत्यंत दु:खद राहिली आहे. मागील चार दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणाला तीन मोठे धक्के बसले आहेत.१८ ऑक्टोबर रोजी भाजपचे नेते, माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले याचं अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं. कर्डीले यांना शनिवारी पहाटे त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
यानंतर महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवरावजी शिवणकर यांचे सोमवारी (२० ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. महादेवराव शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला होता. यासह त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सिंचन मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
advertisement
यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झालं. त्यांच्या निधनाने चाळीसगावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच देशमुखांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात चाळीसगाव विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीपूर्वी त्यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही शहराचे नेतृत्व केले होते. सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि संघटनेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
advertisement
राजकीय वर्तुळात त्यांची एक अभ्यासू नेते म्हणून ओळख होती. आमदारकीनंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला होता. मात्र, सक्रिय राजकारणात ते कायम कार्यरत राहिले. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून त्यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऐन दिवाळीत तीन राजकीय नेते हरपले, शिवाजीराव कर्डीलेनंतर शरद पवार गटाच्या माजी आमदाराचं निधन