पुणेकर काळजी घ्या! अचानक हवा बिघडली, धोका वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरातील हवा प्रदुषणात अचानक वाढ झाली आहे. हवा प्रदुषण विभागाचा अहवाल आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिशय खराब नोंदविण्यात आली आहे. वाकड आणि शिवाजीनगर परिसरातील हवा सर्वाधिक खराब आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करण्यासोबतच इतर काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
advertisement
पुण्यातील विविध भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकात फरक नोंदवला गेला आहे. शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक 248 वर पोहोचला, तर पाषाणमधील पंचवटी 144, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 128, निगडी 123 आणि हडपसर 90 अशी नोंद झाली. शहरातील काही भागांत हवा अतिशय खराब तर काही भागांत मध्यम दर्जाची आहे.
advertisement
advertisement