Jugad : काकडीचा टोकाचा भाग कापून काकडीवर का घासला जातो? उत्तर वाचून तुम्हीही वापराल हा उपाय

Last Updated:
काकडी खाण्यासाठी घेण्यापूर्वी तिचा पुढील आणि मागील भाग कापून ते एकमेकांवर घासले जातात, हे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. हा उपाय केवळ एका परंपरेचा भाग नाही, तर याच्यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण दडलेले आहे.
1/7
काकडी खाण्यासाठी घेण्यापूर्वी तिचा पुढील आणि मागील भाग कापून ते एकमेकांवर घासले जातात, हे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. विशेषत: आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती (आजी, आई) ही पद्धत कटाक्षाने वापरतात. हा उपाय केवळ एका परंपरेचा भाग नाही, तर याच्यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण दडलेले आहे. अनेकदा काकडीचा काही भाग कडू लागतो, आणि याच कडवटपणापासून वाचण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.

advertisement
2/7
काकडीमध्ये 'कुकुर्बिटासिन' नावाचे रसायन असते. हे रसायन मुळात काकडीला कीटकांपासून आणि प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तयार होते. हे रसायन प्रामुख्याने काकडीच्या टोकांच्या भागांमध्ये अधिक प्रमाणात साठलेले असते. याच 'कुकुर्बिटासिन'मुळे काकडीला कडवट चव येते.

3/7
काकडीचे टोक कापून ते मुख्य भागावर घासले असता, एक पांढरा, फेसयुक्त चिकट द्रव बाहेर पडतो. हा पांढरा द्रव म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, याच 'कुकुर्बिटासिन' रसायनाचा अंश असतो. या रसायनाला काढून टाकल्यामुळे काकडीचा कडवटपणा दूर होतो आणि ती खाण्यासाठी अधिक रुचकर लागते.

4/7
टोक कापून घ्या: काकडीचे दोन्ही टोकाकडील भाग सुमारे 1 इंच कापून घ्या. कडवट रसायन याच भागात अधिक असते.

5/7
वर्तुळाकार घासणे: कापलेला एक टोक घेऊन तो काकडीच्या उरलेल्या भागावर वर्तुळाकार गतीने घासा. सुमारे 30 ते 50 सेकंद घासल्यानंतर, जेव्हा फेस बाहेर येणे बंद होईल तेव्हा ही प्रक्रिया थांबवा.

6/7
पाण्याने धुवा: क्युकर्बिटासिन असलेला फेस पूर्णपणे निघून जाण्यासाठी काकडी स्वच्छ पाण्याने धुवा.

7/7
फायदा: यामुळे क्युकर्बिटासिनचा अंश उर्वरित काकडीमध्ये पसरत नाही आणि संपूर्ण काकडी कडू लागण्यापासून वाचते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement