advertisement

हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार! महाराष्ट्रात पुढच्या ४ दिवसांत तापमानात मोठी वाढ; IMD चा अंदाज

Last Updated:

महाराष्ट्रात तापमानात वाढ, रात्रीचा गारवा कमी; हवामान विभागाचा ४ दिवसांचा अलर्ट, कोकण व मध्य महाराष्ट्रात उकाडा, विदर्भात हलक्या सरींचा अंदाज.

News18
News18
राज्यात हळूहळू गारठा कमी होत आला आहे. तामानात वाढ झाली असून आता रात्री देखील काही अंशी उष्णता जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान ढगाळ आणि उष्ण राहिलं आहे. येत्या 48 तासांतही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र लपंडाव सुरू आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी दुपारचा उकाडा, अशा वातावरणाने सर्वसामान्यांसह बळीराजाही चक्रावून गेला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून उकाडा अधिक वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तर आणि मध्य भारतात एकापाठोपाठ एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे वाऱ्यांची दिशा बदलत आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आणि धुक्याचे सावट असले, तरी महाराष्ट्रात मात्र याचे परिणाम वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्राकडून येणाऱ्या उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे.
advertisement
दक्षिणेकडे केरळच्या दिशेनं एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर 2 फेब्रुवारीला नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. काश्मीपासून पुढे उत्तरेकडे वरच्या बाजूला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण किंवा रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत अलर्ट दिला आहे.
येत्या ४ दिवसांत महाराष्ट्राच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीचा गारवा कमी होऊन उबदारपणा वाढेल. तापमानात वाढ झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिवसा उकाडा जाणवेल. मात्र, ४ दिवसांनंतर तापमानात पुन्हा किंचित बदल होऊ शकतो. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर हलक्या सरींचा अंदाज नाकारता येत नाही.
advertisement
उत्तर भारतात सध्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तिथल्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याऐवजी, येथील स्थानिक बाष्पामुळे गारवा गायब होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यास थंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार! महाराष्ट्रात पुढच्या ४ दिवसांत तापमानात मोठी वाढ; IMD चा अंदाज
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement