Video : शिंदे गटाला डिवचलं, बनियन-टॉवेलवर विरोधी पक्षाचे आंदोलन, मविआ आक्रमक

Last Updated:

MVA protest : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बनियन-टॉवेलवर आंदोलन केले. या आंदोलनाने चांगलेच लक्ष वेधून घेतले.

शिंदे गटाला डिवचलं, बनियन-टॉवेलवर विरोधी पक्षाचे आंदोलन, मविआ आक्रमक, व्हिडीओ
शिंदे गटाला डिवचलं, बनियन-टॉवेलवर विरोधी पक्षाचे आंदोलन, मविआ आक्रमक, व्हिडीओ
मुंबई: शिवसेना शिंदे गटाविरोधात आज विरोधक आक्रमक झाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बनियन-टॉवेलवर आंदोलन केले. या आंदोलनाने चांगलेच लक्ष वेधून घेतले. या वेळी मविआ आमदारांनी चड्डी बनियन गँग हाय हाय, या गुंडाराज सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लुटारू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा दिल्या.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमधील जेवणाच्या दर्जावरून कँटिन कर्मचार्‍यांना मारहाण केली. त्यावेळी संजय गायकवाड हे टॉवेल आणि बनियानवर आले होते. त्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय शिरसाट हे बनियावर दिसून आले.
advertisement

विरोधकांच्या बॅनरवर शिंदे गटाचे दोन्ही संजय...

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सतेज पाटील, सचिन अहिर, महेश सावंत आदी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो दिसून आला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : शिंदे गटाला डिवचलं, बनियन-टॉवेलवर विरोधी पक्षाचे आंदोलन, मविआ आक्रमक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement