मालेगावात आंदोलन चिघळलं, जमावाचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून लाठीचार्ज
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण आता या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय देण्यासाठी मालेगावात विविध संघटना एकवटल्या आहेत. हजारोंच्या संख्येनं लोकांनी एकत्र येत जनआक्रोश मोर्चा काढला आहे.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा मालेगाव कोर्ट परिसरात दाखल झाला. यावेळी काही आंदोलकांनी मालेगाव कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी हे सर्व आंदोलक एकवटले आहेत. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध केला.
यावेळी काही आंदोलकांनी मालेगाव कोर्टाच्या कपाऊंडवर चढून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यानंतर काही प्रमाणात आंदोलक पांगले आहेत. मात्र अजूनही कोर्ट परिसरात अनेक आंदोलक ठाण मांडून आहेत. आरोपीला काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजार केलं होतं. त्यावेळी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांची चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती. याच गावातील एका २४ वर्षीय नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची माहिती पीडित मुलीने कुणाला सांगू नये म्हणून त्याने मुलीची निर्घृण हत्या केली. विजय संजय खैरनार असं आरोपी तरुणाचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खैरनारला अटक केली.त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची दिवशी पीडित मुलगी सकाळपासून घराभोवती खेळत होती. ती अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी ती गंभीर अवस्थेत आढळून आली. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोपी खैरनार याचं महिनाभरापूर्वी मुलीच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीनं विकृत कृत्य केल्याची माहिती आहे. दिली.
advertisement
हा प्रकार उघडकीस आल्यापासून डोंगराळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आरोपीला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज जमावाने मालेगाव कोर्टाबाहेर देखील आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलकांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 21, 2025 1:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मालेगावात आंदोलन चिघळलं, जमावाचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून लाठीचार्ज


