Manoj Jarange Patil Candidate List : पाटील म्हणतील तसं! 'या' मतदारसंघातून जरांगेंचे उमेदवार मैदानात, पाहा यादी ..
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil Candidate List : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे उमेदवार जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या मतांची मोट बांधली आहे.
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलकांचे उमेदवार जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या मतांची मोट बांधली आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जे निवडून येणार आहे तेवढेच मतदार संघ लढणार आहोत. थोडंच करायचं पण नीटनेटकं करायचे असे जरांगे यांनी सांगितले. आमच्या पुढे मोठा राक्षस आहे त्याची वाट आम्ही वाट लावणार असल्याचे त्यांनी म्हटले. उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका जातीकडे बघा असे आवाहन ही त्यांनी इच्छुकांना केले. निवडणुकीत पडून अपमान पचवायची ताकत आपल्यात नाही, असे सांगत आपल्याला थोडेच मतदारसंघ लढवायचे असून राजकारणाचे वेड लागू द्यायचे नाही असे जरांगे यांनी म्हटले.
advertisement
फडणवीस यांनी आम्हाला बेजार केलंय, म्हणून आम्ही निवडणुकीच्या मैदानात आलो असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. समाजासाठी आपल्याला 10 ते 20 आमदार पाठवायचे आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मला राजकारणाची व्याख्या बदलायची आहे. मला राजकारणाची सामाजिक व्याख्या करायची आहे. माझी एकतर इच्छा नव्हती राजकारणात जायची. ठाराविक मतदार संघात लढवू आणि महाराष्ट्रातील सगळ्यांनी ताकद लावायची आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
advertisement
>> कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आणि पाडणार?
- बीड जिल्ह्यातून केज राखीव मतदार संघ लढणार
- जालना जिल्ह्यातील मंठा परतूर ही विधानसभेची जागा लढवणार
- संभाजीनगरमधील फुलंब्री मतदार संघ लढवणार
- गंगापूर पाडणार तर कन्नड लढणार...
- औरंगाबाद पश्चिम पाठिंबा देणार
- हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी पाडणार
- हिंगोली मतदारसंघ लढवणार
advertisement
- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाडणार
- पाथरी मतदारसंघ लढणार
- नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदारसंघ लढणार
- लातूर जिल्ह्यातील औसामध्ये उमेदवार पाडणार
यादी अपडेट होत आहे....
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 03, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil Candidate List : पाटील म्हणतील तसं! 'या' मतदारसंघातून जरांगेंचे उमेदवार मैदानात, पाहा यादी ..










