advertisement

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांसह समर्थकांना पोलिसांनी बजावली नोटीस, कारण काय?

Last Updated:

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांचे हे आंदोलन कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जरांगे पाटील यांच्यासह कोअर कमिटी आणि समर्थकांना नोटीस बजावली आहे.

मनोज जरांगे उपोषणावर, पोलिसांनी बजावली नोटीस, कारण काय?
मनोज जरांगे उपोषणावर, पोलिसांनी बजावली नोटीस, कारण काय?
अंतरवाली सराटी, जालना : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांचे हे आंदोलन कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जरांगे पाटील यांच्यासह कोअर कमिटी आणि समर्थकांना नोटीस बजावली आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणाच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. मस्साजोगचे सरपंच दिवगंत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपोषणात सहभागी झाले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांनी आता उपोषण आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी नोटिशीत काय म्हटले?

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने व इतर मागण्यांकरीता सामूहिक उपोषण सुरू झाले आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील उपोषणाकरीता बसले आहेत. मनोज जांगे पाटील यांचसोबत इतर नागरिक देखील सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.
advertisement
पोलिसांनी आपल्या नोटिशीत म्हटले की, उपोषणात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावे, कोणत्या ठिकाणी उपोषणास कोण बसले आहे, आंदोलनकर्त्यांची माहिती दिली नाही. त्याशिवाय, त्यांचे वैद्यकीय अहवालही देण्यात आले नसल्याचे पोलिसांच्या नोटिशीत म्हटले आहे.
सुप्रीम कोर्ट, मुंबई हायकोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार, न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना उपोषणा दरम्यान औषधोपचार घेण्याबाबतची सुचना केली आहे. परंतु काही उपोषणकर्ते हे औषधोपचारास नकार देत असून त्याचा त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आलेले आहे. तरी उच्च न्यायालाचे निर्देशाचे पालन करुन कोणाचेही जिवाचे बरेवाईट होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पोलिसांनी कोअर कमिटीला बजावले आहे. त्याशिवाय, कोर्टाच्या निर्देशाचे पालन करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांसह समर्थकांना पोलिसांनी बजावली नोटीस, कारण काय?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement