महाराष्ट्राची शिवाकाशी: तेरखेडा फटाके निर्मितीतून स्थानिक अर्थव्यवस्थेत तेजी
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तेरखेडा गावात फटाके उद्योगामुळे जवळपास १०,००० लोकांना रोजगार मिळतो. फटाके निर्मिती आणि विक्रीतील विविध प्रक्रियांमध्ये अनेक स्थानिक तरुण-तरुणी आणि कामगार काम करतात.
उदय साबळे- प्रतिनिधी, उस्मानाबाद : दिवाळी म्हटलं की फटाके हे सणाचं मुख्य आकर्षण बनतं, आणि महाराष्ट्रात फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव म्हणजे तेरखेडा. धुळे-सोलापूर हायवेवर वसलेलं हे गाव, “महाराष्ट्राची शिवाकाशी” म्हणून ओळखलं जातं, कारण तेरखेडा गावात उत्कृष्ट दर्जाचे फटाके तयार होतात आणि या फटाक्यांना दिवाळीच्या निमित्ताने विशेष मागणी असते.
गेल्या अनेक वर्षांपासून तेरखेडा हे फटाके उत्पादनाचं केंद्र आहे. इथं तयार होणारे तोफा, सुतळी बॉम्ब, सद्दाम ॲटम बॉम्ब, फुलझडी, आणि इतर प्रकारचे फटाके महाराष्ट्रासह देशात लोकप्रिय आहेत. दिवाळीत, या फटाक्यांच्या खरेदीसाठी तेरखेडा गावात हजारोंची गर्दी होते. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून ग्राहक तेरखेड्यातील फटाके खरेदीसाठी आवर्जून येतात, कारण त्यांना गुणवत्ताधारक आणि किफायतशीर फटाके इथं सहज मिळतात.
advertisement
तेरखेडा गावात फटाके उद्योगामुळे जवळपास १०,००० लोकांना रोजगार मिळतो. फटाके निर्मिती आणि विक्रीतील विविध प्रक्रियांमध्ये अनेक स्थानिक तरुण-तरुणी आणि कामगार काम करतात. विशेषतः दिवाळीच्या काळात, फटाके विक्रीच्या स्टॉल्समधून मोठ्या प्रमाणावर तरुणांना तात्पुरता रोजगार मिळतो. या बाजारपेठेमुळे स्थानिक अर्थव्यवस्था देखील वाढते.
पूर्वी इथं मोजकेच फटाके तयार करणारे कारखाने होते, मात्र मागणी वाढत असल्यामुळे कारखान्यांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक नवीन कामगारांना रोजगार मिळतो आणि तेरखेडा गावात फटाक्यांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होते. तेरखेडा येथील विशेष प्रकारचे फटाके, जसे की सुतळी बॉम्ब, तोफा, आणि सद्दाम ॲटम बॉम्ब, विशेषतः लोकप्रिय आहेत.
advertisement
तेरखेडाच्या या फटाक्यांनी अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, आणि फटाक्यांच्या माध्यमातून गावात आर्थिक समृद्धी येते. याच कारणामुळे, तेरखेडा हे गाव दिवाळीच्या सणात विशेष आर्थिक उलाढाल अनुभवतं, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहकांना आकर्षित करणारं केंद्र ठरतं.
महाराष्ट्रातून तेरखेडा येथे फटाका खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक येतात
तेरखेडा येथील स्पेशल फटाके महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहेत त्यामध्ये तोफा, सद्दाम ॲटम बॉम्ब, फुलझडी यासारखे अनेक तेरखेडा येथे बनवलेले फटाके प्रसिद्ध आहेत
advertisement
तर फटाक्यांच्या माध्यमातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो तर रोजगार प्राप्ती होते तर फटाक्यामुळे तेरखेडा हे गाव सदन आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत झालेले पाहायला मिळते
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 27, 2024 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राची शिवाकाशी: तेरखेडा फटाके निर्मितीतून स्थानिक अर्थव्यवस्थेत तेजी








