Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याची मुदतवाढ का दिली? जरागेंनी सांगितलं खरं कारण
- Published by:Shreyas
Last Updated:
20 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं पुढचं आंदोलन सुरू होणार आहे. हे आंदोलन आता राजधानी मुंबईत होणार आहे. मात्र आंदोलनाच्या या तारखेवरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई, 26 डिसेंबर : 20 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं पुढचं आंदोलन सुरू होणार आहे. हे आंदोलन आता राजधानी मुंबईत होणार आहे. मात्र आंदोलनाच्या या तारखेवरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी शिंदे सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. 24 डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मुदतवाढ देणार नसल्याचा दावा जरांगेंनी वारंवार केला होता. पण ही मुदत संपण्यापूर्वी जरांगेंनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली. त्यावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
24 डिसेंबरनंतर सरकारला एका तासाचीही मुदतवाढ न देण्याचा दावा करणाऱ्या जरांगेंनी सरकारला एक महिन्याची मुदत का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे, यावर जरांगेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. सरकारसाठी नाही तर आम्हाला पिकं जगवायची असल्याने वेळ वाढवून घेतला, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
खरं तर मनोज जरांगेंनी यापूर्वी केलेल्या प्रत्येक आंदोलनावेळी सरकारनं जरांगेंची मनधरणी करीत मुदत वाढवून घेतली होती, मात्र यावेळी अशी कोणतीच मुदत सरकारनं मागितली नाही. 23 डिसेंबरला सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगेंची भेट घेऊन औपचारीकता पूर्ण केली होती, त्यामुळेच जरांगेंनी सरकारला दिलेल्या मुदतीची चर्चा सुरू झाली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
advertisement
'शिंदेशाही आणि जरांगे शाही हे दोन शाही हा विषय कुठे घेऊन जातात आणि याचा कसा एंड करतात यावर आमचं पूर्णतः लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून सरकारला कोणी थांबवलं नाही. वेळ काढूपणा फिरवा फिरवी हे कशाला करता?' असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
advertisement
मनोज जरांगेंनी आता मुंबईत आंदोलनची घोषणा केली आहे. 22 जानेवारीला ते अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशने निघणार आहे. त्यांच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा समाज सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबईत होऊ घातलेल्या या आंदोलनामुळे शिंदे सरकारची चिंता वाढणार आहे. 'जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही, त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीनं काम सुरू आहे', असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 11:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याची मुदतवाढ का दिली? जरागेंनी सांगितलं खरं कारण