MHADA: म्हाडाच्या लॉटरीची वाट बघताय? पण, म्हाडाकडे तर जमिनीच नाही! नेमकं प्रकरण काय

Last Updated:

MHADA: राज्य सरकारकडून म्हाडाला नाममात्र किमतीत जमिनी दिल्या जातात. या जमिनींची रीतसर खरेदी प्रक्रिया केली जाते.

MHADA: म्हाडाच्या लॉटरीची वाट बघताय? पण, म्हाडाकडे तर जमिनीच नाही! नेमकं प्रकरण काय
MHADA: म्हाडाच्या लॉटरीची वाट बघताय? पण, म्हाडाकडे तर जमिनीच नाही! नेमकं प्रकरण काय
मुंबई: मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये घरांच्या आणि जागेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वत:चं घर घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. अशा नागरिकांसाठी म्हाडाची घरं सर्वोत्तम पर्याय ठरतात. मुंबईसह उपनगरांमध्ये म्हाडा सर्वसामान्यांसाठी कमी किमतीची घरं उभारतं. नागरिकांकडून या घरांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. मात्र, नवीन घरांबाबत म्हाडाकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडे घरं बांधण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचं म्हटलं जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाने काही दिवसांपूर्वी ठाणे, नवी मुंबईत 5,362 घरांसाठी लॉटरी अर्ज मागवले आहेत. त्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 1 लाख 84 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मागणी असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, सध्या कोकण मंडळाकडे परवडणाऱ्या घरांचे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी जागाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सुमारे 350 हेक्टर सरकारी जमिनीची मागणी सरकारकडे मागणी केली आहे.
advertisement
ज्या खासगी जमिनीचा कर (शुल्क) भरला जात नाही, त्या जमिनी महसूल विभाग जप्त करते. अशा जमिनी सरकारजमा होतात. अशा जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर आकार पड किंवा महाराष्ट्र शासन असा उल्लेख असतो. या जमिनी सरकारी प्रकल्पांसाठी वापरता येतात. म्हाडा अशाच जमिनीची मागणी सरकारकडे करत आहे. राज्य सरकारकडून म्हाडाला दिल्या जाणाऱ्या जमिनी नाममात्र 1 रुपया किमतीला दिल्या जातात. या जमिनींची रीतसर खरेदी प्रक्रिया केली जाते. मात्र, या जमिनी सामान्यांसाठी घरं बांधण्यासाठीच वापरणे बंधनकारक असते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA: म्हाडाच्या लॉटरीची वाट बघताय? पण, म्हाडाकडे तर जमिनीच नाही! नेमकं प्रकरण काय
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement