Crime: बिर्याणीच्या वजनावरून दोघे भिडले, त्याने एका बुक्कीत खाली पाडलं, बापाला पाहून लेक ढसाढसा रडली VIDEO
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
बिर्याणीच्या वजनाच्या किरकोळ कारणामुळे रायगडमध्ये एक तरूण आणि माजी सौनिकामध्ये तुफान हाणामारी झाली...
प्रमोद पाटील, प्रतिनिधी
पाली, रायगड: राज्यात रोज नवनव्या धक्कादायक घटनांचा उलगडा होत आहे. मारहाण, खून अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. आता रायगडच्या पालीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरूणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसत आहे.
बिर्याणीच्या वजनावरून पेटला वाद:
पाली शहरातील एका दुकानात एक व्यक्ती आपल्या चिमुरड्या मुलांसह बिर्याणी खरेदी करण्यासाठी गेला होता. सुरूवातीला बिर्याणीच्या वजनावरुन माजी सैनिक आणि हॉटेल मालकात वाद पेटला. त्यानंतर काही काळाने हा वाद शांत झाला असता एका बाजूच्या तरूणाने या वादात उडी घेतली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
रायगड: पालीमध्ये दुकानात माजी सैनिक आणि तरुणाची एकमेकांना मारहाण, बिर्याणीचा वजनावरुन झाला वाद pic.twitter.com/IJ7N5XpRbZ
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2024
या वाद इतका जोरदार होता की काही काळाने यातील एकजण गंभीर जखमी होवून खाली कोसळला. यातील एकाच्या डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. पुढे मारहाण करणाऱ्या करणाऱ्या तरूणानेच दुसऱ्या व्यक्तीला हॉटेलमध्ये नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. पुढे या व्यक्तीवर उपचार करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.
advertisement
दुसरीकडे मारहाण करणाऱ्या तरूणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पुढे कारवाई केली जाणार आहे. परंतु, राज्यातील या रोज घडणाऱ्या अशा घटना निश्चितच चिंता वाढवणाऱ्या आहेत. पोलीस प्रशासनाने यावर विशेष काम करण्याची गरज जनतेतून व्यक्त केली जात आहे.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
July 31, 2024 6:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime: बिर्याणीच्या वजनावरून दोघे भिडले, त्याने एका बुक्कीत खाली पाडलं, बापाला पाहून लेक ढसाढसा रडली VIDEO