मुलीचे आई-वडील विळा घेऊन मागे लागले, तरुणाने विहिरीत उडी मारली, दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेतला
- Published by:Suraj
Last Updated:
Buldhana : दाम्पत्याच्या धमकीमुळे विहिरीत उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडलीय.
बुलढाणा : एका १५ वर्षीय मुलीचे आई वडील २३ वर्षीय तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले. दाम्पत्याने पाठलाग करताच तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी १५ वर्षीय मुलीनेसुद्धा गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातली संग्रामपूर तालुक्यातल्या एका गावात घडली. शुक्रवारी तरुणाने जीवन संपवलं तर शनिवारी दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तरुणाचे वडील प्रभाकर मधुकर पुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. त्यांचा मुलगा श्रीकृष्ण पुंडे यानं शुक्रवारी दुपारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. श्रीकृष्ण दुपारी शेतात जात असताना आरोपी दाम्पत्याने विळा दाखवून तुला खल्लासच करतो अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपी तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले.
आरोपी तरुणाच्या मागे धावत असताना तिथं असलेल्यांपैकी गोपाल आढाव यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तिथून धावत सुटलेल्या तरुणाने घाबरून विहिरीत उडी मारली. यावेळी आरोपीच्या पत्नीने आढाव यांना पतीला अडवू नये असं सांगितलं. त्यानंतर दोघेही तरुणाच्या पाठीमागे लागले होते.
advertisement
२३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या १५ वर्षीय मुलीनेसुद्धा गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेमुळे खळबळ उडालीय. १५ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. तिने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. आईला ही घटना समजताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलीचे आई-वडील विळा घेऊन मागे लागले, तरुणाने विहिरीत उडी मारली, दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेतला


