Beed: बिहारलाही लाज वाटेल असा बीड! अल्पवयीन मुलीसोबत भयानक घडलं, पोलीसही झोपले
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
बीड आता बिहारच्याही पुढे गेला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, बीडमध्ये मारहाण, हत्या आणि अपहरणाच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये.
बीड: बीड आता बिहारच्याही पुढे गेला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, बीडमध्ये मारहाण, हत्या आणि अपहरणाच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये. दररोज अपहरण आणि हत्येच्या घटना घडत आहे. अशातच शिरूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हातपाय बांधून शेतात फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या पीडित मुलीसोबत ही तिसऱ्यांदा घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
बीडच्या शिरुर तालुक्यातील वडाळी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचे घराजवळून अपहरण करत तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे, गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी देखील पालकांनी तक्रार केली होती, परंतु, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तिसर्यांदा हा प्रकार घडला.
advertisement
पीडित मुलगी घराच्या पाठीमागील बाजूस थांबलेली असतांना समोरुन आलेल्या दोघांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झालं. त्यानंतर त्या दोघांनी तिला ओढत नेवून जवळच्या शेतात बांधून टाकलं तसंच तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jul 26, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: बिहारलाही लाज वाटेल असा बीड! अल्पवयीन मुलीसोबत भयानक घडलं, पोलीसही झोपले








