Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाने दिलं 6 हजार पानी उत्तर; विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय देणार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणी आपलं उत्तर अध्यक्षांकडे दाखल केलं आहे. यामध्ये आमदारांकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलीय.
अजित मांढरे, मुंबई, 24 ऑगस्ट : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणी आपलं उत्तर अध्यक्षांकडे दाखल केलं आहे. यामध्ये आमदारांकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलीय. जवळपास आठवड्याभरापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांनी आपलं उत्तर दाखल केलं असल्याची माहिती समजतेय.
विधानसभा अध्यक्ष ऱाहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने ६ हजारहून अधिक पानांचे उत्तर दाखल केलं आहे. यामध्ये शिवसेनेनं आपली विचारसरणी सोडून स्वत:च घटनेची पायमल्ली कशी केली याचा दाखला काही आमदारांकडून उत्तरात देण्यात आलाय. शिवसेनेत फुट पडण्याआधी घडलेल्या घडामोडी कायद्याला धरुन कशा होत्या याचे दाखले दिले गेले आहेत.
advertisement
राज्यात २०१४, २०१९ निवडणुकीसाठी झालेल्या बैठका आणि त्यातील तपशील देखील आमदारांकडून या उत्तरात देण्यात आला आहे. तत्कालीन पक्ष प्रमुखांनी घेतलेली भूमिका आणि नंतरची भुमिका याबाबत काही कागदपत्रांसह आमदारांनी उत्तर दिलं आहे. विशेष करुन पक्षात फुट पडत आहे याबाबत आमदारांनी तत्कालिन वरीष्ठांनी लिहिलेल्या पत्राचाही समावेश यामध्ये असल्याची माहिती समजते.
सर्व आमदारांनी मिळुन घेतलेली एक भुमिका आणि तत्कालीन अध्यक्षांना केलेले मेल त्यातील सविस्तर माहिती याचाही समावेश उत्तरात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला शिवसेना नावाचा आणि चिन्हा बाबतचा निर्णय याचाही संदर्भ दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या उत्तरात सविस्तर माहिती विधानसभा अध्यक्षांना सादर केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2023 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाने दिलं 6 हजार पानी उत्तर; विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय देणार