बनावट कागदपत्रं काढून बांग्लादेशी किन्नरचा 'मायानगरीत' वावर, मुंबईत २० घरं, पोलिसांनाही धक्का

Last Updated:

Who is Transgender Guru Babu Khan: किन्नर ज्योतीचे ३०० हून अधिक भक्त आहेत. भक्तांमध्ये गुरु माँ म्हणून ओळखली जाते.

बांग्लादेशी किन्नर ज्योतीला अटक
बांग्लादेशी किन्नर ज्योतीला अटक
राजेश शिंदे, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मूळची बांगलादेशची असलेली किन्नर ज्योती, गुरु माँ उर्फ अयान खानला अटक केली आहे. किन्नर ज्योती ही मागील ३० वर्षांपासून बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात राहत होती. पोलिसांच्या तपासात किन्नर ज्योतीचं नाव बाबू अयान खान असल्याचं समोर आलं. किन्नर ज्योतीचा मुंबईच्या गोवंडी, रफीक नगर, कुर्ला, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे या भागात वावर होता.
किन्नर ज्योतीचे ३०० हून अधिक भक्त आहेत. भक्तांमध्ये गुरु माँ म्हणून ओळखली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफीक नगर भागात अनेक बांगलादेशी किन्नरांना अटक केली. यावेळी किन्नर ज्योतीचे कागदपत्र तपासले. त्यावेळी तिच्याजवळ आधार, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे होते. त्यामुळे किन्नर ज्योतीला सोडण्यात आलं.
ज्योती किन्नरची कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी तिच्याजवळील कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती किन्नरला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात तिच्याजवळ मुंबई २० हून अधिक घरे आढळले आहेत. तिचे अनेक घरे रफीक नगर आणि गोवंडीमध्ये आहे. तिच्या घरात तिचे अनुयायी आणि भक्त राहतात. याच ज्योती किन्नरचा पर्दाफाश झाला आहे.
advertisement
पोलिसांनी ज्योती उर्फ अयान खानच्या विरोधात पासपोर्ट कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून इतके दिवस भारतात कशी राहत होती, तिला बनावट कागदपत्रे कुणी बनवून दिले, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बनावट कागदपत्रं काढून बांग्लादेशी किन्नरचा 'मायानगरीत' वावर, मुंबईत २० घरं, पोलिसांनाही धक्का
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement