BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, कोणत्या भागात किती किंमतीची घरे? जाणून घ्या सगळी माहिती

Last Updated:

BMC Housing Lottery: बीएमसीने आणि म्हाडाने सामान्य माणसाला घराच्या बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. अल्प आणि अत्यल्प घटकातील नागरिकांसाठी बाजारभावा पेक्षा कमी दरात घरे उपलब्ध करुन देण्याचं काम हे संस्था करत आहेत.

News18
News18
मुंबई शहराची मायानगरी म्हणून ओळख आहे. या मायानगरीमध्ये स्वत:चं घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या मायानगरीमध्ये जर तुम्ही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने काम केलंत तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार, हे नक्की. ज्यांचं मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्न आहे, अशांसाठी ही बातमी आहे. मुंबईमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता बीएमसीने आणि म्हाडाने सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम केलं आहे. अल्प आणि अत्यल्प घटकातील नागरिकांसाठी बाजारभावा पेक्षा कमी दरात घरे उपलब्ध करुन देण्याचं काम हे संस्था करत आहेत.
मुंबईत घरांच्या किंमती अक्षरश: गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाईल का? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता सामान्य मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी (BMC Housing Lottery) काढण्यात येणार आहे. यासाठी 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असणार आहेत. अलीकडेच याची सोडत निघाली असून जर तुम्ही देखील या घरासाठी जर इच्छूक असाल तर तुम्हीही अर्ज भरा.
advertisement
26 ते 38 चौरस मीटर कार्पेट एरिया व अल्प आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत 54 लाखांपासून 1 कोटी 12 लाखांपर्यंत आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अन्वये प्राप्त 426 सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबरपासून सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जदारांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यत अर्ज भरता येणार आहे. 14 नोव्हेंबर रात्री 11:59 वाजेपर्यंत इच्छूक अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासोबतच अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम भरता येणार आहे.
advertisement
पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. सोडतीसंदर्भात माहिती पुस्तिका 16 नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. भायखळा, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर, कांजूरमार्ग, भांडूप या ठिकाणी घरं आहेत. सदनिका विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज मागविण्यात येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, कोणत्या भागात किती किंमतीची घरे? जाणून घ्या सगळी माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement