NAAC: महाविद्यालयांची लागणार कसोटी! मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असलेल्या 439 शिक्षण संस्थांचं होणार 'ऑडिट'
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
NAAC: नॅक ऑडिटसाठी 439 महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत.
अविनाश कानडजे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: ज्या महाविद्यालयाचं नॅककडून मूल्यांकन होते आणि चांगले ग्रेड मिळतात, ते महाविद्यालय दर्जेदार समजले जाते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचं प्रशासकीय आणि शैक्षणिक अंकेक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 439 महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत.
ज्या महाविद्यालयांचं आतापर्यंत 'नॅक' मूल्यांकन झालेलं नाही, अशा महाविद्यालयांना प्राथमिक स्तरावर समिती प्रथम भेटी देणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचं प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाविद्यालयांकडून अर्जही मागवले होते. 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकूण 439 महाविद्यालयांनी प्रशासकीय आणि शैक्षणिक ऑडिटसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
advertisement
विद्यापिठाने दिलेल्या माहितीनुसार, 19 महाविद्यालयांचे अर्ज अद्याप अपूर्ण स्थितीत आहेत. ज्या महाविद्यालयांची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया झाली आहे, त्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना प्राथमिक स्तरावर एक समिती भेटी देणार आहे. विद्यापीठाने 'नॅक' ऑडिट झालेल्या 153 महाविद्यालयांची यादी देखील जाहीर केली आहे.
advertisement
नॅक म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही केंद्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता तपासली जाते. 1994 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार या संस्थेची स्थापना झालेली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NAAC: महाविद्यालयांची लागणार कसोटी! मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असलेल्या 439 शिक्षण संस्थांचं होणार 'ऑडिट'