ड्युटी संपवून घरी जात होता जवान, धावत्या बाईकवर अचानक चिरला गळा, नागपुरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उपराजधानी नागपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका अग्निशमन दलाच्या जवानासोबत भयंकर प्रकार घडला आहे.
नागपूर: उपराजधानी नागपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका अग्निशमन दलाच्या जवानासोबत भयंकर प्रकार घडला आहे. संबंधित जवान रविवारी रात्री ड्यूटी संपवून घरी जात असताना अचानक त्याचा गळा चिरला आहे. हा प्रकार घडताच आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. जवानाच्या गळ्यावर खोलवर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
नेमकी घटना काय?
जखमी जवानाचे नाव गोविंदा बावणे असून, ते नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज फायर स्टेशनमध्ये 'प्रमुख अग्निशामक विमोचक' म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास आपली कर्तव्य पार पाडून बावणे दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, कमाल चौक परिसरातून जात असताना अचानक एका तुटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात येऊन अडकला.
जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक
advertisement
मांज्या गळ्यात अडकताच बावणे यांनी मोठ्या प्रसंगावधान राखून दुचाकीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र, नायलॉन मांजा अत्यंत धारदार असल्याने त्यांचा गळा खोलवर कापला गेला. गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने ते जागीच रक्तबंबाळ झाले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. गळ्याची जखम खूप खोल असल्याने त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
बंदी असूनही नायलॉन मांज्याचा सर्रास वापर
नागपूर पोलीस आणि प्रशासनाकडून नायलॉन मांज्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे. विक्री करणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत, तरीही शहरात नायलॉन मांज्याचा सर्रास वापर सुरू आहे. या मांज्यामुळे पक्षी आणि मानवी जीवांना धोका निर्माण झाला. विशेष म्हणजे संक्रात संपून १५ दिवस उलटले आहेत, तरीही मांजाचा वापर सुरू आहे. एका जवानाचा अशाप्रकारे गळा चिरल्याने खळबळ उडाली आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ड्युटी संपवून घरी जात होता जवान, धावत्या बाईकवर अचानक चिरला गळा, नागपुरला हादरवणारी घटना!









