4 वर्षाचं प्रेम क्षणात संपवलं, नागपुरात डॉक्टर तरुणीकडून प्रियकराचा खेळ खल्लास, कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपूरच्या नंदनवन कॉलनी परिसरात प्रेमसंबंधातून एका डॉक्टर तरुणीने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
नागपूर: नागपूरच्या नंदनवन कॉलनी परिसरात प्रेमसंबंधातून एका डॉक्टर तरुणीने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. लग्नावरून झालेल्या वादातून बीएएमएसची इंटरर्नशिप करणाऱ्या तरुणीने प्रियकरावर चाकूने वार करत त्याची हत्या केली, तर स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.
बालाजी कल्याणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर रती देशमुख असं आरोपी तरुणीचं नाव आहे. आरोपी रती देशमुख ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून सध्या ती इंटर्नशिप करत होती. मागील चार वर्षांपासून तिचे बालाजी कल्याणेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. बालाजीला रतीसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याने तगादा लावला होता. मात्र तरुणीने थेट आपल्या प्रियकराचाच खून केला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक बालाजी कल्याणे आणि आरोपी रती देशमुख यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या लग्नावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. याच वादातून बुधवारी रात्री रतीने बालाजीवर चाकूने वार केले, ज्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर, प्रियकराची हत्या केल्यानंतर रतीने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.
advertisement
रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्यामुळे रती देशमुखला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर अद्याप उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर होताच पोलीस तिला ताब्यात घेतील.
हत्येपूर्वी वडिलांना अल्टिमेटम
पोलिसांनी मयत बालाजीच्या मोबाईलची तपासणी केली असता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बालाजीने हत्येच्या अवघ्या एक दिवस आधी रतीच्या वडिलांना अल्टिमेटम दिला होता. "जर आमचे लग्न झाले नाही, तर माझ्या मरणासाठी तुम्हाला नागपूरला यावं लागेल," असा संदेश त्याने रतीच्या वडिलांना पाठवला होता. यावरून लग्नासाठी बालाजी किती टोकाची भूमिका घेत होता हे स्पष्ट होते.
advertisement
मृतक बालाजीचा भाऊ ऋषिकेश कल्याणे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी रती देशमुख हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांच्या प्रेमसंबंधाचा असा रक्तरंजित अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 06, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
4 वर्षाचं प्रेम क्षणात संपवलं, नागपुरात डॉक्टर तरुणीकडून प्रियकराचा खेळ खल्लास, कारण समोर


