दीक्षाभूमीच्या व्हिजिटर बुकवर राहुल गांधीनी काय लिहलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राहुल गांधी आज संविधान सन्मान परिषदेसाठी नागपूरात आले होते. यावेळी सभेपूर्वी राहुल गांधी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सभेपूर्वी राहुल गांधी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.यानंतर दीक्षाभूमीवरून परतताना राहुल गांधी यांनी व्हिजिटर बुकवर एक खास संदेश लिहला आहे.हा संदेश नेमका त्यांनी काय लिहला आहे? हे जाणून घेऊयात.
राहुल गांधी आज संविधान सन्मान परिषदेसाठी नागपूरात आले होते. यावेळी सभेपूर्वी राहुल गांधी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते.यानंतर राहुल गांधी यांनी व्हिजिटर बुकवर आपला संदेश लिहिला आहे. ‘त्यागाच्या या अद्भुत ठिकाणी येण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळते, मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद"- राहुल गांधी, असा संदेश राहुल गांधी यांनी लिहला आहे.
advertisement
देशात करोडो दलीत आहे. त्यांचे दुःख, त्यांचा आवाज या संविधान यायला हवा.या संविधानात फुले, आंबेडकर, गांधी यांचा आवाज आहे. आपण संरक्षण करतोय हे हजारो वर्ष जुनं पुस्तकं आहे. यात कुठे लिहीलं नाही एक व्यक्ती देशातील धन, भविष्य घेऊ शकेल, असा टोला राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लगावला.
संविधानापासून देशातील विविध संघटना बनतात. निवडणूक आयोग, इतर संस्था बनतात. संघ यावर पुढून हल्ला नाही करु शकत. समोरुन वॅार केला तर पाच मिनीटांत हारेल. त्यामुळे ते लपून येतात. विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या लपून येतात. आणि संविधानवर हल्ला करतात. पण दम असतात तर समोरुन आले असते, असा हल्ला देखील राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर चढवला.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Nov 06, 2024 3:27 PM IST











