ज्या महानगरपालिकेत बाप शिपाई, तिथेच मुलगा झाला नगरसेवक! नागपुरात गणेश चर्लेवार यांच्या विजयाने बापाच्या कष्टाचं सोनं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूर महानगरपालिकेत भाजपने गड राखला, प्रभाग 31 मधून गणेश चर्लेवार विजयी. वडील शिपाई, मुलगा नगरसेवक झाल्याने कुटुंबात आनंद आणि परिसरात जल्लोष.
नागपुरात भाजपने आपला गड पुन्हा एकदा राखला असला, तरी खऱ्या चर्चेत आहे ती प्रभाग क्रमांक ३१ ची निवडणूक. संघाचे कट्टर स्वयंसेवक गणेश चर्लेवार यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. विशेष म्हणजे, ज्या नागपूर महापालिकेत गणेश यांचे वडील शिपाई म्हणून कार्यरत आहेत, तिथेच आता मुलगा साहेब होऊन येणार असल्याने प्रशासकीय वर्तुळातही या 'पठ्ठ्या'चे कौतुक होत आहे.
मुंबईला डबे पोहोचवणाऱ्या बापाचा मुलगा जसा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झाला असून तो आता गाडा हाकणार आहे. तसं आणखी एक डोळ्यात पाणी आणणारी नागपूरच्या पठ्ठ्याची कहाणी आहे. घरात परिस्थिती साधी आणि वडील महानगरपालिकेत शिपाई म्हणून काम करत आहेत. ज्या महानगरपालिकेत वडील शिपाई म्हणून काम करतात तिथेच आता त्यांचा मुलगा नगरसेवक होणं वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या विजयाने कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
नागपूर महानगरपालिकेचे निकाल हाती आले आहेत. नागपुरात पुन्हा भाजपने गड राखला आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून गणेश चर्लेवार विजयी झाला आहे. त्याचे वडील नागपूर महानगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गणेश चर्लेवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं. ते संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं. शिवसेनेनेच्या कोट्यातून भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून विजय साजरा झाला.
advertisement
नागपूरमध्ये भाजपने सलग चवथ्यांदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये विजयी जल्लोषात सहभागी होणार आहेत. नागपूर हा भाजपचा गड समजला जातो. त्यामुळे नागपुरातला हा विजय फार महत्त्वाचा आहे.
नागपूर महानगरपालिका
एकुण जागा- 151
भाजप- 103
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 01
ठाकरे- 02
काँग्रेस- 31
मनसे-00
शरद पवार गट- 00
advertisement
MIM - 07
मुस्लीम लीग - 04
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या महानगरपालिकेत बाप शिपाई, तिथेच मुलगा झाला नगरसेवक! नागपुरात गणेश चर्लेवार यांच्या विजयाने बापाच्या कष्टाचं सोनं










