advertisement

Nagpur News : दोन भटक्या सांडांची टक्कर, बुलेटची तोडफोड; नागपूरमधला VIDEO व्हायरल

Last Updated:

आजकाल भटक्या प्राण्यांचा वावर अधिक झाला असून वेगवेगळ्या शहरांत त्यांची दहशत पहायला मिळत आहे. कधी कुत्र्यांची दहशत तर कधी गायी, म्हैस, सांड, अशा भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात.

दोन भटक्या सांडांची टक्कर, बुलेटची तोडफोड
दोन भटक्या सांडांची टक्कर, बुलेटची तोडफोड
नागपूर, 27 डिसेंबर : आजकाल भटक्या प्राण्यांचा वावर अधिक झाला असून वेगवेगळ्या शहरांत त्यांची दहशत पहायला मिळत आहे. कधी कुत्र्यांची दहशत तर कधी गायी, म्हैस, सांड, अशा भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशातच भटक्या प्राण्याच्या दहशतीची आणखी एक घटना समोर आलीय. भटक्या सांडांनी शहरांत धुमाकूळ घाल्याचं पहायला मिळालं. या सांडांनी लोकांचं बरंच नुकसानही केलं. या घटनेनं लोक संताप व्यक्त करत आहे.
नागपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आलीय. नागपूरमधील वसंत नगर परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दोन सांडांकडून चांगलाच धुडगूस घातला जात आहे. सांडांच्या लढाईत चांगलाच उपद्रव माजवीला असून लोकांनी त्यांना हाकण्याचा खूप प्रयत्न केला मात्र हे सांड काही मानायलाच तयार नव्हते. त्यांची धुडगूस कायम आहे.
advertisement
या दोन सांडांनी लढाई केली. त्यांच्या या भयानक लढाईत त्यांनी आजसापच्या गाड्या पाडल्या. त्यांना पळविण्यासाठी लोकांनी त्यांच्यावर पाणी टाकलं, फटाके फोडले, त्यांच्यावर लाठी उगारली पण सांडांची झुंज आणखी तीव्र झाली या झुंजीत परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली इतरही साहित्याचे नुकसान झाले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सांडांच्या वाढत्या उपद्रवामुळे भीतीच वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून लोकांनी या घटनेविषयी प्रशासनाला पाऊल उचलण्याची विनंती केलीय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur News : दोन भटक्या सांडांची टक्कर, बुलेटची तोडफोड; नागपूरमधला VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement