Mohan Bhagwat : जात, धर्म, संविधान, पर्यावरण ते OTT प्लॅटफॉर्म, सरसंघचालकांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Last Updated:

आरएसएसचे संरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जात, धर्म, संविधान यासह पर्यावरण ते ओटीटी प्लॅटफॉर्म या मुद्द्यांवर परखड भाष्य केलं.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीबागेत पार पडला. यावेळी बोलताना आरएसएसचे संरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जात, धर्म, संविधान यासह पर्यावरण ते ओटीटी प्लॅटफॉर्म या मुद्द्यांवर परखड भाष्य केलं. भारतासह जगासमोर आव्हाने वाढत चालली आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतायत. त्यांना मदतीची गरज असल्याचंही भागवत म्हणाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा कंटेट इतका आक्षेपार्ह आहे की त्यावर बोलणंही अभद्र ठरेल असं मोहन भागवत यांनी म्हटलंं.
advertisement
भारत पुढे जाऊ नये यासाठी काही शक्ती कार्यरत
मनुष्यजीवन प्रगतीमुळे सुखी आहे. आपला देश पुढे चालला आहे. शिक्षा, तंत्रज्ञानमध्ये समाजाची समज पुढे चालली आहे. देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न शासन, प्रशासन, शेतकरी, युवकांकडून होत आहे. देश पुढे जाईल पण आव्हाने समोर आहेत. केवळ संघ, हिंदू समाज समोर, भारतासमोर आव्हान नसून पूर्ण जगासमोर आव्हान आहे. भारत पुढे गेला नाही पाहिजे असं वाटणाऱ्या काही शक्ती आहेत. त्यांचा विरोध होणारच,तसं होत देखील आहे.
advertisement
गणपती मिरवणुकीत दगडफेक झाली, सरकारने वेळीच कारवाई करावी
देशाचा सीमाभाग अवस्थ आहे, या भागात अलगाववाद असल्याने ही स्थिती आहे. ट्रॅफिक जाम झालं तरी अस्वस्थता होऊ शकते. अस्वस्थता व्यक्त करण्याचे काही मार्ग संविधानात आहे. पण तसं न होता गुंडागर्दी केली जाते उपद्रव करणारे तस करवून घेतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बाबत सूचित केले होते. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाली त्याला काही करण नव्हते. सरकारने यावर वेळीच कारवाई केली पाहिजे, अनेक वेळा होते अनेक वेळा कारवाई होत नाही. प्रशासन पोहोचेपर्यंत नागरिकांना त्रास होतो.
advertisement
संतांना जातीमध्ये वाटलं गेलंय, नेत्यांनी जनजागृती करावी
काही कार्यक्रम केल्याने सामाजिक समरसता येणार नाही त्यासाठी परिवारात जाऊन काम करावे लागेल. विषमता इतकी वाढली की संताना जातीमध्ये वाटलं गेलं. जातीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी आपल्या जातीमध्ये जागृतीकरणे गरजेचे आहे.
पर्यावरणाबद्दल कृतज्ञता राखा
सृष्टी राहणार की नाही यावर चर्चा केली जात आहे. ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पर्यवरणाच्या बाबतीत अर्ध्या माहितीच्या आधारावर चालले जात आहे. जगाच्या मागे चालत गेलो त्यामुळे जमीन नापीक होत आहे, जंगल कापले जात आहे, नदी आटत चालल्या आहे. विचार बदलून पर्यावरण प्रति कृतज्ञता राखून पुढे जावं लागेल.
advertisement
पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा अन् वृक्षारोपण करा
10 हजार वर्षे जैविक शेती होत असताना अजूनही जमीन सुपीक आहे. रासायनिक खत वापरल्याने 200 वर्षात जमीन बंजार झाली. पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी , वृक्षारोपण केलं पाहिजे, या तीन गोष्टींचे पालन केले पाहिजे. वृक्ष रोपण करताना देशी वृक्ष लावा. काही वृक्ष विदेशातून आणले गेले, त्यावर पक्षी बसत नाही. वायू विषारी आहे असे वृक्ष कापायला सरकार परवानगी देत आहे.
advertisement
ओटीटी प्लॅटफर्मवर नियंत्रण हवं
नवीन शिक्षानीती मध्ये संस्कार आले पाहिजे. शिक्षण घेताना त्याचा मूर्तिमंत उदाहरण शिक्षक, प्राध्यापक असायला पाहिजे. OTT प्लॅट फॉर्म वर जे दाखविले जाते ते सांगितलं तरी अभद्रता होईल यावर नियंत्रण आले पाहिजे.  चालताना नियमांचे पालन केले पाहिजे.
संविधान अमलात आणलं पाहिजे
रोजच्या आयुष्यात संविधान अमलात आणले पाहिजे. संविधानाचे 4 प्रकरण महत्वाचे, प्रस्तावना, मार्गदर्शन तत्व, मूलभूत कर्तव्य, अधिकार यांची माहिती सर्व भारतीयांना मिळाली पाहिजे.
advertisement
धर्म भारताचा स्व, प्राण आणि प्रेरणा
धर्म भारताचा स्व आहे, प्राण आहे, प्रेरणा आहे. धर्म नाही. भारतात जे कर्तृत्व, संघर्ष झाले ते धर्मासाठी झाले आहेत. हिंदू धर्म विश्व धर्म आहे. आमच्या घरात भाषा, भूषण आपले पाळले पाहिजे. विदेशात भ्रमण, पर्यटन करताना देशातही भ्रमण करा. समरसता, सदभावना, कुटुंब प्रबोधन, नागरिक आचरण, पर्यावरण या महत्वाच्या गोष्टी आहेतय. संवेदनशीलता प्रकट करण्याचा मार्ग हिंसक अजिबात नकोय. संयत व्यवहार करणे समाजाने शिकावे.
शक्तीसंपन्न होण्याची आवश्यकता
सशक्त बनावे, विश्व शक्ती पाहते. जे अशक्त असतात त्यांना कोणीही विचारत नाही. आता जगात भारताचा मान वाढला आहे. बलशाली बनला आहे,आधी तसे नव्हते. संघटित समाजाचे बळ पाहिजे त्यासाठी आरएसएस कार्य करते. आरएसएसमध्ये बळ सोबत शीलाची आराधना करण्यात येते. आव्हानामधून आम्हाला बाहेर पडावे लागेल,त्यासाठी शक्तीसंपन्न होणे आवश्यक आहे. भारत निर्माण करण्याची ही साधना आहे.
बांगलादेशातील हिंदूंना मदतीची गरज
बांगलादेशात हिंदुवर वारंवार अत्याचार होत आहे. पहिल्यांदा हिंदू आपल्या रक्षणासाठी एकत्रित आला. बांगलादेश मध्ये हिंदूंना भारत सरकारच्या मदतीची गरज आहे. हिंदू दुर्बल होईल तर अत्याचार होतील. बांगलादेश मध्ये अशी चर्चा आहे की भारतापासून त्यांना भीती असून पाकिस्तान आपला खरा मित्र आहे. ज्या बांगलादेशला भारताने पूर्ण मदत केली तिथे अश्या चर्चा होतात त्या कोणत्या देशाच्या फायद्याच्या आहेत? भारत सामर्थ्यवान झाला तर त्याचा धोका वाटतो.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Mohan Bhagwat : जात, धर्म, संविधान, पर्यावरण ते OTT प्लॅटफॉर्म, सरसंघचालकांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement