घरकुल एक प्रेम कथा! प्रशासनाच्या एका चुकीने मोडला संसार; पत्नी म्हणाली, 'घर बांधा, तरच परत येईन!'

Last Updated:

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात प्रकाश सोनाळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधायचे होते. मात्र, गावात आणखी एक प्रकाश सोनाळे नावाचा व्यक्ती...

Nanded News
Nanded News
नांदेड : हदगाव तालुक्यातील मनाठा गावच्या प्रकाश मनोहर सोनाळे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे पक्कं घर बांधण्याचं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत 2018-19 मध्ये नाव आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता आपल्या कुटुंबाला हक्काचं, सुरक्षित छप्पर मिळणार, या विचाराने त्यांनी राहतं मातीचं घर पाडलं आणि जवळची जमापुंजी खर्च करून नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात केली. पण त्यांना कुठे माहित होतं की, शासकीय घोळ आणि नावाच्या साधर्म्यामुळे त्यांचं हे स्वप्न एका दुःस्वप्नात बदलणार आहे.
सविस्तर घटना अशी की...
झालं असं की, गावात प्रकाश सोनाळे नावाचे दोन व्यक्ती होते. दुसरे प्रकाश अनेक वर्षांपासून स्थलांतरीत (मरडगा) आहेत, तरीही काही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरकुलाचा प्रस्ताव दाखल केला आणि योजनेचा 15 हजार रुपयांचा पहिला हप्ताही त्यांच्याच खात्यात जमा झाला. खरा लाभार्थी असलेल्या प्रकाशने जेव्हा याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी आपलं नाव खरं लाभार्थी असल्याचं सिद्ध केलं आणि प्रशासनानेही ते मान्य केलं.
advertisement
अखेर पत्नीने घर सोडलं अन् माहेरी गेली
त्यानंतर मात्र प्रकाशच्या नशिबी प्रतीक्षाच आली. अर्धवट बांधलेलं घर आणि शासनाच्या अनुदानाच्या आशेवर ते दिवस काढू लागले. पण त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. पैशाअभावी घराचं काम थांबलं. यावरून घरात पती-पत्नीमध्ये रोज खटके उडू लागले. अर्धवट घरात राहण्यास पत्नीने नकार दिला. "घर पूर्ण बांधल्याशिवाय मी परत येणार नाही," असा निश्चय करून तिने अखेर पतीला सोडून माहेरचा रस्ता धरला.
advertisement
हसता-खेळता संसार उघड्यावर पडला
एकीकडे पत्नी सोडून गेली आणि दुसरीकडे प्रशासकीय दिरंगाईचा फेरा सुरूच होता. पंचायत समितीने आपली चूक मान्य करत चुकीच्या व्यक्तीकडून पैसे वसूल केले आणि खऱ्या प्रकाशच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी जिल्हा कार्यालयाला पत्रही पाठवले. पण त्या पत्राला तब्बल आठ महिने उलटून गेले, तरी त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एका साध्या नावाच्या घोळामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रकाश सोनाळे यांचं हक्काच्या घराचं स्वप्न तर भंगलंच, पण त्यांचा हसता-खेळता संसारही उघड्यावर पडला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
घरकुल एक प्रेम कथा! प्रशासनाच्या एका चुकीने मोडला संसार; पत्नी म्हणाली, 'घर बांधा, तरच परत येईन!'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement