Nanded News : ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचे बोट छाटलं, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप; नांदेडमध्ये खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे अपहरण करून त्याचे बोट छाटलं असल्याची घटना घडली आहे.
मुजीब शेख, नांदेड : सोशल मीडियावर राजकीय विषयांवर, मुद्यांवर टीका टिप्पणी होत असते. सोशल मीडियावरील या राजकीय पडसादही उमटत असते. माजी खासदाराविरोधात टीका करणारी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या जीवावर बेतली असती. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे अपहरण करून त्याचे बोट छाटलं असल्याची घटना घडली आहे. आपल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या या पीडित पदाधिकाऱ्याने केला.
सोशल मीडियावरील पोस्ट ठरली कारणीभूत...
माजी खासदाराच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे गटाच्या लोहा येथील उपशहरप्रमुखाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. नांदेडमध्ये हा प्रकार घडला. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या.
advertisement
या आक्षेपार्ह पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. याच पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल (मंगळवारी) रात्री वडवळे यांचे अपहरण केले. एका फार्महाऊस वर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीत त्यांचे एक बोट छाटले गेले.
दारूची बॉटल डोक्यावर ठेवून नाचायला लावले..
दारूची बॉटल डोक्यावर ठेऊन वडवळे यांना नाचायला लावले. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना पोस्ट बद्दल माफी मागायला लावली असल्याचा आरोप आहे. बेदम मारहाणीत जखमी झालेले ठाकरे गटाचे पदाधिकारी वडवळे यांना रुग्णालयात टाकून आरोपी पसार झाले असल्याचा आरोप वडवळे यांच्या आई आणि त्यांच्या भावाने केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
advertisement
दरम्यान, नांदेड मतदारसंघात चिखलीकर यांची दादागीरी वाढली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक केली नाही तर लोहा - कंधार बंद करण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आला आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
October 02, 2024 7:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचे बोट छाटलं, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप; नांदेडमध्ये खळबळ