Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात, नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं आठ दुचाकींना चिरडलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Nanded Accident : नांदेडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव ट्रकन आठ दुचाकींना चिरडलं आहे. या घटनेत मोठं आर्थिक नुकसान देखील झालं आहे.
नांदेड, मुंजीब शेख, प्रतिनिधी : नांदेडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव ट्रकनं उभ्या असलेल्या आठ दुचाकींना चिरडलं आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत मोठं आर्थिक नुकसान देखील झालं आहे. नांदेड - भोकर महामार्गावरील बारड परिसरात ही घटना घडली आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ दुचाकी भरधाव ट्रकने चिरडल्या आहेत . या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. नांदेड - भोकर महामार्गावरील बारड येथे आज आकरा वाजता हा अपघात घडला.
advertisement
नांदेडहून भोकरकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला . बारड बसस्थानकाबाहेर रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या या ठिकाणीं काही जण सावलीत थांबले होते. याच ठिकाणी हा भरधाव ट्रक घुसला . यात एकाचा चिरडून मृत्यु झाला तर अन्य आठ जण जखमी आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये दुचाकीचं देखील मोठं नुकसानं झालं आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
April 30, 2024 1:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात, नियंत्रण सुटलेल्या ट्रकनं आठ दुचाकींना चिरडलं