Vande Bharat: नांदेड ते मुंबई फक्त 9 तासांत, वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक पाहिलं का?

Last Updated:

Vande Bharat: भारतीय रेल्वेने मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईला जलद आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस
वंदे भारत एक्सप्रेस
जालना: नांदेड ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईला जलद आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करून वेळापत्रक जाहीर केले आहे. ही ट्रेन आता नांदेडहून मुंबईपर्यंत अवघ्या 9 तास 15 मिनिटांत पोहोचणार आहे, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होणार आहे.
स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
परभणी - पहाटे 5.40 वाजता/ पहाटे 5.42 वाजता
जालना - सकाळी 7.20 वाजता / सकाळी 7.22 वाजता
छत्रपती संभाजीनगर- सकाळी 8.13 वाजता / पहाटे 8.15 वाजता
अंकाई - सकाळी 9.40 वाजता/ 9.42
मनमाड - सकाळी 9.58 वाजता / सकाळी 10.03 वाजता
नाशिक रोड - सकाळी11 वाजता / सकाळी 11.02 वाजता
advertisement
कल्याण -दुपारी 1 वाजून 20 मिनिटे/ दुपारी 1.22 वाजता
ठाणे - दुपारी 1.40 वाजता/ दुपारी 1.42 वाजता
दादर - दुपारी 2.10 वाजता / दुपारी 2.12 वाजता
आणि सीएसएमटी येथे दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20706 गुरुवार वगळता दररोज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघेल.
advertisement
स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
दादर - दुपारी 1.17 वाजता / दुपारी 1.19 वाजता
ठाणे -दुपारी 1.40 वाजता / दुपारी 1.42 वाजता
कल्याण - दुपारी 2.04. वाजता / दुपारी 2.06 वाजता
नाशिक रोड - दुपारी4.18वाजता / दुपारी 4.20
मनमाड - सायंकाळी 5.18 वाजता / सायंकाळी 5.20 वाजता
अंकाई - सायंकाळी 5.50 वाजता / सायंकाळी5.52 वाजता
advertisement
छत्रपती संभाजीनगर - सायंकाळी 7.05 वाजता / सायंकाळी 7.10 वाजता
जालना - रात्री 8.05 वाजता / 8.07 वाजता
परभणी - रात्री 9.43 वाजता / रात्री 9.45 वाजता
नांदेड येथे रात्री दहा वाजून 50 मिनिटांनी पोहचेल.
वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असून, ती 160 किमी/तास वेगाने धावते. यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास कोच उपलब्ध आहेत, जे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह आरामदायक प्रवास देतात. सीसीटीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे आणि वैक्यूम टॉयलेट्स यांसारख्या सुविधांमुळे ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटचा वापर करता येईल.
advertisement
हा विस्तार मराठवाडा आणि मुंबई दरम्यानच्या संपर्काला बळकटी देणारा ठरणार आहे. मात्र, काही प्रवाशांनी सकाळी 5 वाजण्याऐवजी ट्रेन 4 वाजता सुटावी, अशी मागणी केली आहे, जेणेकरून मुंबईतील कार्यालयीन कामे वेळेत पूर्ण होतील. रेल्वे प्रशासन यावर विचार करत आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Vande Bharat: नांदेड ते मुंबई फक्त 9 तासांत, वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक पाहिलं का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement