Nashik Loksabha Result: नाशिकमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार की शिंदेंचा बाण चालणार? शिवसेनाचा गड कोणाकडे जाणार?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार असून महायुतीकडून त्यांनी उमेदवारी देण्यात आली होती
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार असून महायुतीकडून त्यांनी उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होती. निवडणुकीचा निकाल आता काहीच वेळात समोर येणार आहे.
नाशिक लोकसभेसाठी सरासरी 72.24 टक्के मतदान झालं होतं. इतर निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला होता. याचा फायदा नेमका कोणाला झाला हे आता समोर आलं आहे. या मतदारसंघात महाविकासआघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर होणार असल्याचं म्हटलं जात होतं. यानंतर अखेर आता निकाल समोर येणार आहे.
advertisement
नाशिक मतदारसंघाचा इतिहास
नाशिक मतदार संघाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला नाशिककर खासदार म्हणून निवडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दोन्ही पक्षांसाठी नाशिक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. गेल्या दोन्ही टर्ममध्ये शिवसेनेने इथे विजय मिळवलेला आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभेत हेमंत गोडसे यांनी विजय मिळवला होता.
advertisement
'मेगा एक्झिट पोल'चा अंदाज
सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय 'मेगा एक्झिट पोल' नुसार महाराष्ट्राच्या विभागवार कोणत्या आघाडीला किती जागा मिळाल्या हे आम्ही सांगणार आहोत. यामध्ये कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला शून्य ते 2 तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा आणि 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबई ठाण्यातील 10 जागांपैकी इंडिया आघाडीला शून्य ते 2 जागा तर एनडीएला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांमध्ये इंडिया आघाडीला शून्य ते 2 जागा, एनडीएला चार ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील 10 जागा पैकी इंडिया आघाडीला 4 ते 6 जागा आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 11 जागापैकी मविआला 4 ते 6 जागा आणि एनडीएला 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 04, 2024 7:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Loksabha Result: नाशिकमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार की शिंदेंचा बाण चालणार? शिवसेनाचा गड कोणाकडे जाणार?