Nashik Blast: नाशिकच्या सातपूर परिसरात भीषण स्फोट, 7 जण होरपळले, नेमकं काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनाच्या चाकामुळे डिझेल ड्रम फुटून स्फोट झाला. 7 जण गंभीर जखमी, 8 किरकोळ जखमी. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: शहरातील सातपूर परिसरात आज सकाळी एक भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जण गंभीररित्या होरपळले असून, 8 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना इतकी विचित्र आणि भीषण होती की काही कळण्याआधीच पेट घेतला आणि स्फोट झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
स्फोट कशामुळे झाला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सातपूर परिसरातील रस्त्यावर घडली. एका वाहनाचे चाक डिझेलच्या ड्रमवरून गेल्याने तो ड्रम फुटला. त्यातून डिझेल सर्वत्र उडाले आणि या डिझेलने लागलीच पेट घेतला. स्फोट आणि आग लागण्याचे नेमके कारण म्हणजे, ड्रम फुटल्यानंतर जवळच सिगारेट पीत असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर डिझेल उडाल्याने ती व्यक्ती आगीच्या भक्ष्यस्थानी आली.
advertisement
आगीत सात जण होरपळले, प्रकृती गंभीर
या भीषण स्फोटामुळे आणि आगीमुळे एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सातपूर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 08, 2025 1:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Blast: नाशिकच्या सातपूर परिसरात भीषण स्फोट, 7 जण होरपळले, नेमकं काय घडलं?