नाशिकमध्ये घर खरेदी करताय, हे आहेत दोन प्राईम लोकेशन, पण दर नेमके किती?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
nashik prime locations - नाशिक शहरात सर्वात जास्त प्रमाणात मुंबई व पुणे या सारख्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने गुंतवणूक म्हणून घरे अथवा प्लॉट घेताना दिसतात. त्याकरीता नाशिकमधील मुख्य ठिकाण असलेल्या नाशिक रोड परिसरात तुम्ही आपले भविष्याचे घर घेऊ शक्यता.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - नाशिक शहर हे हरित आणि पर्यावरण पूरक असे शहर असल्याने शहराचा वाढता व्याप पाहता आता अनेक भागात मोठी मोठी अपार्टमेंट बनत चालले आहे. अनेक नागरिक गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात घरे अथवा प्लॉट खरेदी करण्यास उत्सुक आहेत. पण नाशिकमधील कुठल्या भागात किंवा ठिकाणी प्रॉपर्टी घ्यावी, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
नाशिक शहरात सर्वात जास्त प्रमाणात मुंबई व पुणे या सारख्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने गुंतवणूक म्हणून घरे अथवा प्लॉट घेताना दिसतात. त्याकरीता नाशिकमधील मुख्य ठिकाण असलेल्या नाशिक रोड परिसरात तुम्ही आपले भविष्याचे घर घेऊ शक्यता. हे ठिकाण मध्यवर्ती असून यात तुम्हला रेल्वे स्टेशन ते बसस्थानकसुद्धा जवळ आहे. तसेच काही वर्षातच या ठिकाणी अनेक मोठे प्रोजेक्ट सुद्धा बनत असल्याने येणाऱ्या काळात या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टीला मोठा भाव देखील असणार आहे.
advertisement
नाशिक रोड या परिसरात साधारण 2 बीएचके घराची किंमत ही 35 ते 40 लाख आहे. याठिकाणी साधारण 4 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका भाव आहे. तर कमर्शियलचा भाव हा 1500 रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका आहे. त्याचप्रमाणे जसे जसे तुम्ही प्राईम लोकेशन बघणार तसतसा हा भाव बदलत जाणार असल्याचे या व्यवसायातील कन्सल्टन्ट अमोल सांगळे यांनी सांगितले.
advertisement
कांद्यावर करपा, फुलकिडीचा धोका, शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, कृषी विभागाने सांगितला महत्त्वाचा सल्ला
गंगापूर रोडला गंगापूर डॅम असल्याने तसेच काही अंतरावर कॉलेजेस असल्याने या ठिकाणीही मोठा भाव आहे. तर मग तुम्हालाही नाशिकमध्ये घर घ्यायचे या 2 ठिकाणच्या प्राईम लोकेशनवर तुम्ही खरेदी करू शकतात.
काय काळजी घ्याल -
अनके नागरिक हे इतर ठिकाणाहून या ठिकाणी वस्तू घेण्यासाठी येत असतात. आपल्या सोबत कुठलेही गैरकृत्य नको, यासाठी तसेच सावधगिरी बाळगण्यासाठी जमिनीची आणि घराची सर्व कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. घराची व्हॅल्यू ही सर्व कागदपत्रे, करार नामा आणि घर सध्या कुणाच्या नावावर आहे, ही संपूर्ण माहिती घेऊन पुढे व्यवहार करावा. हा व्यवहार मोठा असल्याने एजंटमार्फत फसवणूक होण्याची शक्यता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिली.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 01, 2024 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये घर खरेदी करताय, हे आहेत दोन प्राईम लोकेशन, पण दर नेमके किती?