VIDEO : कानशि‍लात लगावलं, लाथाबुक्क्यांनी मारलं...नवी मुंबई दोन पुरुषांनी चार महिलांना बेदम चोपलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन पुरुषांनी मिळून चार महिलांना लाथाबुक्क्यांनी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन पुरुषांनी मिळून चार महिलांना लाथाबुक्क्यांनी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईच्या दिघामध्ये ही घटना घडली आहे.या घटनेनंतर रबाळे पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आगे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिघा परिसरातील एका चाळीत चार महिलांचा दोन पुरूषांसोबत वाद सूरू होता. शाब्दीक वाद सूरू असताना पुढे जाऊन हा वाद हाणामारीपर्यंत गेला होता. यावेळी दोन पुरूषांनी मिळून चार महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच या दरम्यान महिलांना धमकावण्यातही आले होते. या मारहाणीला महिलांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. कौटुंबिक वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.
advertisement
या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये दोन पुरूष महिलांना मारहाण करताना दिसत आहे. या घटनेनंतर महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.पण रबाळे एमआयडीसी पोलीसांची टाळाटाळ केली होती.त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांने आयुष्य संपवलं

नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोहार असं आत्महत्या करणाऱ्या ३४ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते नवी मुंबईच्या सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पत्नीसोबत फोनवरून झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई स्वप्नील लोहार हे उलवे येथील आपल्या निवासस्थानी एकटेच होते. याचवेळी त्यांचा पत्नीशी फोनवर जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने लोहार यांना खाली उतरवलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी लोहार यांना मृत घोषित केलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : कानशि‍लात लगावलं, लाथाबुक्क्यांनी मारलं...नवी मुंबई दोन पुरुषांनी चार महिलांना बेदम चोपलं, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement