बच गया! दर्शन घे, काकाचं; अजित पवार बोलताच रोहित पवार पाया पडले, प्रितीसंगमावर काय घडलं?
- Published by:Suraj
Last Updated:
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची कराडमध्ये प्रितीसंगमावर भेट झाली.
कराड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा कराडमध्ये प्रितीसंगमावर पोहोचले होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यांची भेट झाली. या भेटवेळी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या संवादाची चर्चा आता होत आहे.
प्रितीसंगमावर जात असताना अजित पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांची भेट घेतली. बच गया, दर्शन घे... दर्शन, काकाचं. वाचलास, नाहीतर माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? असं मिश्लिकपणे अजित पवार तेव्हा म्हणाले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
advertisement
अजित पवारांच्या भेटीबद्दल आणि त्यांच्या पाया पडल्याबद्दल विचारले असता रोहित पवार यांनी सांगितलं की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. विचारात भिन्नता आता तरी आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडण्याची आपली संस्कृती आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी माझी मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या या भूमीत कोणताही भेदभाव करून चालत नाही.
advertisement
रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत झालेल्या संवादावरही प्रतिक्रिया दिली. माझ्या सभेने अडचण झाली असती या अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले की,सभा झाली असती तर काही प्रमाणात वर खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. पण बारामतीत ते इतके अडकून पडले की त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी ते मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा होता. आज त्यांचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे. त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं आहे.
advertisement
दरम्यान, रोहित पवार यांना कराडमध्ये प्रितीसंगमावर भेटीवेळी आपण असं काही बोललो नाही असं म्हणत अजित पवार यांनी प्रश्नाला बगल दिली. अजित पवार यांनी म्हटलं की, मी तसं काही बोललो नाही. मी त्याला शुभेच्छा दिल्या. निवडून आलायस आता चांगलं काम कर म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2024 10:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बच गया! दर्शन घे, काकाचं; अजित पवार बोलताच रोहित पवार पाया पडले, प्रितीसंगमावर काय घडलं?