छगन भुजबळांना मोठा धक्का, बेनामी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश
- Published by:Sachin S
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
छगन भुजबळ यांच्या अडचणीमध्ये आता अचानक एंट्री झाली आहे. छगन भुजबळांविरोधातील 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश दिले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चांगलेच आक्रमक आहे. मनोज जरांगे यांना सरकारने अध्यादेश दिल्यामुळे भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच महाराष्ट्र सदन प्रकरणात चिमणकरांना दिलासा मिळाला आहे तर छगन भुजबळांना कोर्टाने दणका दिला आहे. छगन भुजबळांविरोधातील 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश दिले आहे.
छगन भुजबळ यांच्या अडचणीमध्ये आता अचानक एंट्री झाली आहे. छगन भुजबळांविरोधातील 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश दिले आहे. खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 6 ऑक्टोबरला निश्चित केली आहे.
advertisement
मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्तांप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध आयकर विभागाने 2021 मध्ये कार्यवाही सुरू केली होती. या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स बजावलं होतं. मात्र, सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाने तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विलोकन याचिका मंजूर केल्यास कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे स्वातंत्र्य दिलं असल्याचं देखील आदेशात नमूद केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 11:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छगन भुजबळांना मोठा धक्का, बेनामी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश