धनंजय मुंडेंच्या परतीची चर्चा, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदाराचा पक्षाला घरचा अहेर, अजितदादांवरही नाराज
- Published by:Sachin S
Last Updated:
मंत्रिपद देताना मात्र शरद पवार यांच्यापासून ते अजित पवार यांच्यापर्यंत दोघांनी ओबीसी समाजाला संधी दिली.
बीड: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना २०२४ मधील कृषि विभागातील खरेदी आणि विक्री प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात कमबॅकची चर्चा रंगली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच धनंजय मुंडे यांच्याबद्दल संकेत दिले आहे. पण, बीडमधूनच आता धनंजय मुंडेंच्या परतीला विरोध केला जात आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजितदादांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
"मी आज अनुभवी आहे, वरिष्ठ आहे. माझी पाचवी टर्म आहे. परंतु, पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसी गटासाठी राखीव आहे. त्यामुळे बहुजनांना संधी न देण्याचं ठरवलं आहे असं दिसतंय ती त्यांची भूमिका आहे. त्याबद्दल आता मी काय बोलावं' असं म्हणत सोळंकेंनी नाराजी व्यक्त केली.
advertisement
तसंच, 'मला ३५ वर्षांतला इतिहास माहिती आहे. सातत्याने बीड जिल्ह्यात मराठा समाज ही राष्ट्रवादीचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीचे दाखल देता येईल, केवळं प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. पण मंत्रिपद देताना मात्र शरद पवार यांच्यापासून ते अजित पवार यांच्यापर्यंत दोघांनी ओबीसी समाजाला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ही वस्तु स्थिती आहे. हे अनुभवाचे बोल आहे. मी जे राजकारण पाहिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या दृष्टीने बीड हा ओबीसी समाजासाठी राखीव असावा, असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला आहे.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Jul 26, 2025 9:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडेंच्या परतीची चर्चा, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदाराचा पक्षाला घरचा अहेर, अजितदादांवरही नाराज








