NCP : शरद पवार का अजित पवार? पुण्याच्या आमदाराने दोन महिन्यांनंतर कोंडी फोडली

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहायचं का अजित पवारांसोबत जायचं अशी कोंडी झाली होती, या कोंडीतून अजूनही काही आमदार सुटले नसून काहींनी मागच्या दोन महिन्यात कोणतीही भूमिका घेतली नव्हती.

राष्ट्रवादीमधल्या राजकीय नाट्यानंतर आमदारांची कोंडी
राष्ट्रवादीमधल्या राजकीय नाट्यानंतर आमदारांची कोंडी
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 28 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे अखेर आज अजित पवारांसोबत जाहीर कार्यक्रमात हजर झाले. गेले दोन महिने शरद पवार अजित पवारांना खाजगीत भेटून आपण तुमच्यासोबतच असल्याचं तुपे सांगत होते, पण मतदारसंघात जाहीररित्या दोन्ही गटात वावरण्याच इतके दिवस तुपेंनी टाळल होतं. आज अखेर मतदार संघात योगेश ससाणे यांनी घेतलेल्या ध्वजस्तंभ उद्घाटन प्रसंगी चेतन तुपे अजित पवारांसोबत दिसले.
advertisement
हडपसर मधून एकेकाळी शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये तुपे कुटुंबाचा समावेश व्हायचा. सध्या आमदार असलेल्या चेतन तुपे यांचे वडील माजी खासदार विठ्ठलराव तुपे हे शरद पवारांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य होते, त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चेतन तुपे काय करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेल होतं. तुपे यांनीही दोन महिने भरपूर कोलांटउड्या घेतल्या पण आपण कुठे ते जाहीर केलं नाही. मात्र आज हडपसर मध्ये जाहीर कार्यक्रमात अजित पवार हे चेतन तुपे यांच्याच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मतदारसंघात जो जाहीर निरोप द्यायचा तो दिला.
advertisement
चेतन तुपे हे एकाच वेळी शरद पवार यांनाही भेटायला जात होते आणि अजित पवार यांना ही भेटत होते. शासकीय बैठकांना ते आमदार म्हणून अगदी अजित पवारांच्या शेजारी बसत होते, मात्र मतदारसंघात त्यांनी जाहीररित्या आपण अजित पवार किंवा शरद पवार यांच्यापैकी कुणाच्या गटात आहोत ते स्पष्ट केल नव्हतं. दोन वेळा नगरसेवक , तीन वेळा आमदार आणि सुरेश कलमाडींचा पराभव करून पुण्याचे खासदार झालेल्या विठ्ठल तुपे यांचे चिरंजीव असल्याने राष्ट्रवादीच्या फुटीत चेतन तुपे यांची राजकीय कोंडी झाली होती. दोन महिने त्यांनी कसेबसे काढले मात्र मतदारसंघात अजित पवारांच्या हस्ते ठेवलेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमात त्यांना अखेर भूमिका घ्यावी लागलीय. ते अजित पवारांच्याच बाजूला असल्याचं आज स्पष्ट झालंय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : शरद पवार का अजित पवार? पुण्याच्या आमदाराने दोन महिन्यांनंतर कोंडी फोडली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement