Sharad Pawar : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा गड उद्ध्वस्त, महायुतीचं वर्चस्व, अजूनही निकालावर मौन

Last Updated:

गेल्या तीन दशकांपासून पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा गड मानला जात होता. पण या गडाला महायुतीने सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला.

News18
News18
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीच अक्षरश: त्सुनामी आली. या त्सुनामीत महाविकास आघाडीची वाताहात झाली. महायुतीनं २३४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तर शिवसेनेनं ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला फक्त ५० जागाच जिंकता आल्या. यात ठाकरे गटाला २० तर काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या. महायुतीने शरद पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावला. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने ५८ पैकी ४६ जागा जिंकल्या.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीने ११ जागी बाजी मारली. महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात ३२ आणि अपक्ष ४ अशा मिळून ४६ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या ७, ठाकरेंच्या दोन तर काँग्रेसला एक अशा १० जागांवरच विजय मिळवता आला.
गेल्या तीन दशकांपासून पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा गड मानला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं या विभागात एकहाती वर्चस्व होतं. गेल्या निवडणुकीत पुण्यात २१ पैकी ११ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. यावेळी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांना फक्त ७ जागांवरच समाधान मानावं लागलंय.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अद्याप शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. निकालावर त्यांनी मौन बाळगलं आहे.
advertisement
शरद पवारांविरुद्ध अजितदादांनी मारली बाजी
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे 37 जागांवर आमनेसामने आले. लोकसभेत अजित पवार आणि शरद पवार आमनेसामने आले होते. त्यात शरद पवार सरस ठरले. आता मात्र, अजित पवारांनी त्या पराभवाची सव्याज परतफेड केली. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अजित पवारांनी 37 पैकी 27 जागांवर विजय मिळवला. तर शरद पवार गटाची 8 जागांवर सरशी झाली. उर्वरित 2 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा गड उद्ध्वस्त, महायुतीचं वर्चस्व, अजूनही निकालावर मौन
Next Article
advertisement
BMC Election : BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं? Inside Story
BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?
  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

View All
advertisement