दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण? CM फडणवीसांना भेटल्यावर सुनील तटकरे म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या अकाली निधनाने पक्ष शोकसागरात बुडालेला असताना सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीचे दर्शन घेतले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज माझी चर्चा झाली. जनतेच्या आणि आमदारांच्या मनात काय हे जाणून घेऊ, उपमुख्यमंत्रिपदाविषयी सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने पक्ष शोकसागरात बुडालेला असताना सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा तपशील दिला.
दादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे अत्यंत क्लेशकारक
दादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला झटका बसला आहे. त्यातून आम्ही सावरलेलो नाही. आम्ही शोकमग्न अवस्थेत आहोत. त्यामुळे आज दादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे अत्यंत क्लेशकारक आहे. जिथे त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले, त्या कार्यालयात त्यांच्याशिवाय जाणे हे पचत नाही. अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, तिथे जाऊन मी नमस्कार केला, असे तटकरे यांनी सांगितले.
advertisement
धार्मिक विधी सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट झाली पण....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. अजित पवार यांच्या सावडण्याचा विधी सुरू आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करू. जनतेच्या मनातील, आमदारांच्या मनातले जाणून घेऊन पुढील निर्णय घेऊ. चर्चा करून उपमुख्यमंत्रिपदाचं काय ते ठरवू, असे सुनील तटकरे म्हणाले.
advertisement
सुनेत्रा पवार यांच्याशी उपमुख्यमंत्रिपदाविषयी चर्चा
सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलावले आहे. सुनेत्रा पवार यांच्याशी आज किंवा उद्या चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समजते आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री कोण? CM फडणवीसांना भेटल्यावर सुनील तटकरे म्हणाले...








