advertisement

Flight Mode : विमानात फोन एअरप्लेन मोडमध्ये असणं का गरजेचं? तसं नाही केलं तर काय होईल?

Last Updated:
अनेकांना वाटतं की फोन चालू राहिला तर विमान कोसळेल की काय? पण खरंच एका साध्या मोबाईल सिग्नलमध्ये विमान पाडण्याची ताकद असते का? की यामागे काही वेगळंच तांत्रिक गणित दडलंय? चला, आज विमानातील या सर्वात महत्त्वाच्या नियमामागचं 'विमान' रहस्य सोप्या भाषेत उलगडून पाहूया.
1/9
विमानाने प्रवास करताना खिडकीतून बाहेर दिसणारे ढग आणि निळं आकाश पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण हा आनंद लुटण्यापूर्वी विमानात बसल्या बसल्या एअरहोस्टेसकडून एक सूचना वारंवार दिली जाते.
विमानाने प्रवास करताना खिडकीतून बाहेर दिसणारे ढग आणि निळं आकाश पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण हा आनंद लुटण्यापूर्वी विमानात बसल्या बसल्या एअरहोस्टेसकडून एक सूचना वारंवार दिली जाते. "कृपया आपला मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर टाका किंवा स्विच ऑफ करा." आपल्यापैकी अनेकजण ही सूचना ऐकताच फोनचा मोड बदलतात, तर काहीजण "एका फोनने काय होणार आहे?" असा विचार करून दुर्लक्ष करतात.
advertisement
2/9
अनेकांना वाटतं की फोन चालू राहिला तर विमान कोसळेल की काय? पण खरंच एका साध्या मोबाईल सिग्नलमध्ये विमान पाडण्याची ताकद असते का? की यामागे काही वेगळंच तांत्रिक गणित दडलंय? चला, आज विमानातील या सर्वात महत्त्वाच्या नियमामागचं 'विमान' रहस्य सोप्या भाषेत उलगडून पाहूया.
अनेकांना वाटतं की फोन चालू राहिला तर विमान कोसळेल की काय? पण खरंच एका साध्या मोबाईल सिग्नलमध्ये विमान पाडण्याची ताकद असते का? की यामागे काही वेगळंच तांत्रिक गणित दडलंय? चला, आज विमानातील या सर्वात महत्त्वाच्या नियमामागचं 'विमान' रहस्य सोप्या भाषेत उलगडून पाहूया.
advertisement
3/9
विमानात 'एअरप्लेन मोड' अनिवार्य का? फोन बंद नाही केला तर नक्की काय होतं? वाचा रंजक माहितीविमान हवेत झेपावण्यापूर्वी एअरप्लेन मोड ऑन करणं ही केवळ औपचारिकता नसून ती सुरक्षित प्रवासासाठी घेतलेली एक खबरदारी आहे. त्याचे परिणाम विमानावर आणि जमिनीवरील नेटवर्कवर अशा दोन्ही ठिकाणी होतात.

4/9
1. पायलट्सच्या कानात 'कर्कश' आवाज येतोआधुनिक विमानं खूप सुरक्षित असतात आणि त्यांच्या सिस्टिमवर मोबाईल सिग्नलचा थेट परिणाम होऊन विमान कोसळण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. मात्र, खरी समस्या येते ती कम्युनिकेशनमध्ये. जेव्हा तुमचा फोन नेटवर्क शोधत असतो, तेव्हा त्यातून रेडिओ लहरी बाहेर पडतात. जर अनेक प्रवाशांचे फोन चालू असतील, तर वैमानिकाला (Pilot) एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी (ATC) बोलताना हेडफोनमध्ये 'टक्-टक्' असा अडथळा किंवा कर्कश आवाज ऐकू येतो. टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी स्पष्ट संवाद होणं अत्यंत गरजेचं असतं, तिथे हा छोटासा आवाजही वैमानिकाची एकाग्रता भंग करू शकतो.

5/9
2. मोबाईल टॉवर्सवर वाढतो 'ताण'विमान जेव्हा 30-50 हजार फूट उंचीवर असतं आणि ताशी 800-900 किमी वेगाने धावत असतं, तेव्हा तुमचा फोन जमिनीवरील मोबाईल टॉवर्सशी कनेक्ट होण्यासाठी धडपडत असतो. इतक्या वेगाने प्रवास करताना फोन एकाच वेळी अनेक टॉवर्सच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतो. यामुळे जमिनीवरील मोबाईल नेटवर्कवर विनाकारण ताण येतो आणि तिथे असलेल्या इतर युजर्सच्या कॉल कॉलिटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

6/9
3. एअरप्लेन मोड नक्की काय करतो?जेव्हा तुम्ही एअरप्लेन मोड ऑन करता, तेव्हा तुमच्या फोनमधील मोबाईल नेटवर्क (GSM), Wi-Fi आणि ब्लूटूथ हे तिन्ही सिग्नल ट्रान्समिट होणं बंद होतं. यामुळे तुमचा फोन कोणत्याही बाहेरच्या लहरींशी संपर्क साधत नाही आणि विमानाची सिस्टिम शांतपणे काम करू शकते.

7/9
4. मग फ्लाइटमधील Wi-Fi चं काय?आजकल अनेक विमान कंपन्या प्रवासात वाय-फाय (Wi-Fi) सुविधा देतात. हे वाय-फाय सॅटेलाइटच्या माध्यमातून चालतं. विमान ठराविक उंचीवर पोहोचल्यावर क्रू मेंबर्स तुम्हाला वाय-फाय वापरण्याची परवानगी देतात. अशा वेळी तुम्ही एअरप्लेन मोड ऑन ठेवूनही वाय-फाय सुरू करून इंटरनेट वापरू शकता, कारण यामुळे मोबाईल नेटवर्कच्या लहरी तयार होत नाहीत.

8/9
5. नियम मोडला तर काय होऊ शकतं?केबिन क्रू सुरुवातीला तुम्हाला नम्रपणे विनंती करतात. पण जर एखादा प्रवासी वारंवार सूचना देऊनही फोन बंद करत नसेल, तर तो 'फ्लाइट सेफ्टी' नियमांचे उल्लंघन मानला जातो. अशा परिस्थितीत प्रवाशाला ताकीद दिली जाऊ शकते आणि अत्यंत गंभीर प्रकरणात लँडिंगनंतर कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

9/9
तुमचा एक छोटासा 'एअरप्लेन मोड' स्विच वैमानिकाला शांतपणे विमान चालवण्यास मदत करतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही विमानात बसाल, तेव्हा स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी आपला फोन नक्की 'डिस्कनेक्ट' करा, जेणेकरून तुम्ही आकाशाशी 'कनेक्ट' होऊ शकाल.

Gold Silver ETF Crash: काही तासांत करोडोंचा चुराडा, सोनं-चांदी ईटीएफमध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
काही तासांत करोडोंचा चुराडा, Gold-Silver ETF मध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
  • Gold Silver ETF गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार हा दिवस धक्कादायक ठरला

  • गोल्ड-सिलव्हर ईटीएफमध्ये १४ टक्क्यांची घसरण दिसून आली.

  • अचानक झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

View All
advertisement