National Institute Of Technology Job: नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदासाठी भरती, उमेदवाराला 1 लाख 12 हजार वेतन मिळवण्याची संधी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
National Institute Of Technology Recruitment: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नॉन टीचिंग पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या अंतर्गत प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (National Institute Of Technology, Delhi) यांनी नॉन टीचिंग पदांसाठी (Non-Teaching Recruitment) अर्ज मागवले आहेत. ज्या अंतर्गत प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार NIT दिल्लीच्या अधिकृत साइट nitdelhi.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अंतिम तारीख 22 ऑक्टोबर आहे. 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत इच्छूक अर्जदार रात्री 11:55 मिनिटांपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीअंतर्गत संस्थेच्या 14 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 'गट ब' ची 2 पदं आणि 'गट क' ची 12 पदं निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://nitdelhint.samarth.edu.in/index.php/site/login या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. 'गट ब'मध्ये टेक्निकल अस्टिस्टंट पदासाठी भरती आहे, तर 'गट क'मध्ये सिनियर टेक्निशियन, सिनियर असिस्टंट, टेक्निशियन, कम्प्यूटर ॲप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅकेनिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ज्युनियर असिस्टंट, लॅब अटेंडंट आणि ऑफिस अटेंडंट अशा वेगवेगळ्या पदांसाठी नोकरभरती केली जात आहे.
advertisement
खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गांमध्ये संपूर्ण 14 जागा विभाजित करण्यात आली आहेत. कोणकोणत्या पदासाठी कोणकोणते शिक्षण लागत आहे, या बद्दलच्या सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी जाहिरातीच्या PDF वर एकदा नजर टाकायची आहे. त्याप्रमाणेच नोकरीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असून अर्ज शुल्क प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. अर्ज शुल्क आणि 18 टक्के जीएसटी अशी अर्ज शुल्काची रक्कम अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने द्यायची आहे.
advertisement
खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग या अर्जदारांना 1000 आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 180 रूपये असे एकूण 1180 रूपये इतके अर्ज शुल्क भरायचे आहे. तर, अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील अर्जदारांना 500 आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 90 रूपये असे एकूण 590 रूपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. भरतीप्रक्रियेमध्ये वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार आहे. 'गट ब' साठी 35,400 ते 1,12,400 इतका पगार असणार आहे, तर 'गट क'साठी 18,000 ते 81,100 पर्यंत पगार असणार आहे. 'गट क' अनेक पदं आहेत, पदाप्रमाणे अर्जदाराला पगार मिळेल.
Location :
Maharashtra
First Published :
October 05, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
National Institute Of Technology Job: नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदासाठी भरती, उमेदवाराला 1 लाख 12 हजार वेतन मिळवण्याची संधी