Manoj Jarange : ‘त्या’ मुद्यावरून ओबीसी नेत्याने मनोज जरांगेंना खडसावलं, दिला सबुरीचा सल्ला
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
ते पुढे म्हणाले, की राज्यात कुणबीच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी खाडाखोड केलेल्या आहेत . आम्हाला त्या नोंदी मान्य नाहीत
=नांदेड (मुजीब शेख, प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत त्यांना सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी कसं आंदोलन करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. सर्वांना आंदोलन करायचे अधिकार आहेत. मात्र, माझी सर्व आंदोलकाना विनंती आहे की आंदोलन, मागण्या घटनात्मक कायदेशीर असल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल दिली
प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले, की राजस्थानमध्ये गुज्जर समजाने हिंसक आंदोलनं केली पण त्यांना आरक्षण मिळालं नाही. आरक्षणाचा विषय घटनात्मक आहे. आता कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारने दिलं आहे . मराठा समाजाने ते आरक्षण घ्यावं. राज्यात सामाजिक सलोखा राखावा अशी माझी विनंती असल्याचं शेंडगे म्हणाले.. ते म्हणाले, आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, की कोणाबद्दल अपशब्द किंवा खालची भाषा वापरू नये. कोणाच्या भावना दुखावतील असं बोलू नये.
advertisement
57 लाख नोंदी खाडाखोड केलेल्या -
ते पुढे म्हणाले, की राज्यात कुणबीच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी खाडाखोड केलेल्या आहेत . आम्हाला त्या नोंदी मान्य नाहीत . निझामकालीन अकबरकालीन नोंदी घेऊन कोणी आरक्षणाचा दावा करत असेल तर ते घटनात्मक नाही . त्याला आम्ही न्यायालयात आव्हान दिलं आहे . न्यायालयात ते टिकणार नाही, त्या नोंदी बोगस आहेत आम्हाला मान्य नाहीत, असं प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले . ओबीसीमध्ये यायचा मार्ग सोपा नाही. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं त्याला आमचा पाठिंबा आहे, असंही प्रकाश अण्णा शेंडगे यावेळी बोलताना म्हणाले
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : ‘त्या’ मुद्यावरून ओबीसी नेत्याने मनोज जरांगेंना खडसावलं, दिला सबुरीचा सल्ला