कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या, हुबळी- पंढरपूर दरम्यान धावणार एक्सप्रेस
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. यंदा यात्रेसाठी दोन विशेष अनारक्षित गाड्या सोडण्याची तयारी केली आहे. कार्तिकी एकादशीसाठी
हुबळी आणि पंढरपूरदरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
या अंतर्गत दोन विशेष अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक- डाऊन 07351 आणि अप 07352 एसएसएस हुबळी- पंढरपूर अनारक्षित एक्स्प्रेस विशेषच्या चार फेऱ्या होणार आहेत. हुबळी येथून गाडी क्रमांक 07351 29 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 07352 पंढरपूरहून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हुबळी येथे पोहोचेल. या रेल्वेला 1 एसी टू- टायर, 2 एसी थ्री- टायर, 12 स्लीपर, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 ब्रेक व्हॅन असे एकूण 22 कोच असतील.
advertisement
तर दुसरी ट्रेन हुबळी- पंढरपूर एक्सप्रेस अशी असणार आहे. गाडी क्रमांक- डाऊन 07367 आणि अप 07368 एसएसएस हुबळी- पंढरपूर अनारक्षित एक्सप्रेसच्या विशेष आठ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 07367 ही 30, 31 ऑक्टोबर आणि 2, 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:10 वाजता हुबळीहून सुटून दुपारी 4 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 07368 ही पंढरपूरहून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हुबळीला पोहोचेल. या रेल्वेला सुद्धा 1 एसी टू- टायर, 2 एसी थ्री- टायर, 12 स्लीपर, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 ब्रेक व्हॅन असे एकूण 22 कोच असतील.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 29, 2025 9:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या, हुबळी- पंढरपूर दरम्यान धावणार एक्सप्रेस


