चीनमधून आलेल्या फटाक्यांची तस्करी, DRI ची मोठी कारवाई, ४० फूट कंटेनरमध्ये...

Last Updated:

तपासात गुन्ह्याशी संबंधित दस्तऐवज मिळाले असून, गुजरातच्या वेरावलमधून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

चिनी फटाके
चिनी फटाके
मयुरेश गणपत्ये, प्रतिनिधी, मुंबई : ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चीनमधून आलेल्या फटाक्यांच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. न्हावा शेवा बंदरावर पकडलेल्या 40 फूट कंटेनरमध्ये लेगिंग्ज' असल्याचे दाखवून आत 46हजार 640 फटाके लपविण्यात आले होते.
एकूण 4 कोटी 82 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. तपासात गुन्ह्याशी संबंधित दस्तऐवज मिळाले असून, गुजरातच्या वेरावलमधून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. या तस्करीचा तपास डीआरआयचे अधिकारी करीत आहेत.
फटाक्यांची आयात ही मर्यादित असून, त्यासाठी डीजीएफटी आणि पेसोची परवानगी आवश्यक आहे. डीआरआयने अशा धोकादायक तस्करीविरोधात कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चीनमधून आलेल्या फटाक्यांची तस्करी, DRI ची मोठी कारवाई, ४० फूट कंटेनरमध्ये...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement