Operation Sindoor Ind Vs Pak : 15 दिवसांपूर्वी आया बहिणींचं कुंकू पुसलं, ऑपरेशन सिंदूर ऐकून पुण्याच्या जगदाळे काकू म्हणाल्या, मोदींना आमची जाणीव
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Operation Sindoor : भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेवर पहलगाम पीडितांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यातील दिवगंत संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेवर पहलगाम पीडितांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यातील दिवगंत संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेत मंगळवारी रात्री उशिरा पीओकेमधील मुजफ्फराबाद, मदिरके आणि कोटली येथे एअर स्ट्राईक केली. भारताच्या या हवाई हल्ल्यात 12 दहशतवादी ठार झाले आहेत तर 55 दहशतवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर देशभरात समाधान व्यक्त केले जात आहे.
काय म्हणाले जगदाळे कुटुंबीय?
advertisement
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील 8 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला होता. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी या सर्जिकल स्ट्राइकवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रगती जगदाळे यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूर योग्य नाव दिले आहे. दहशतवाद्यांनी मोदी यांच्या लेकींचे सिंदूर पुसलं. पंतप्रधान मोदी यांना त्याची जाणीव आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं असल्याची प्रतिक्रिया प्रगती जगदाळे यांनी दिली.
advertisement
दहशतवादी तळावर हल्ले, भारताने काय म्हटले?
भारतीय सैन्याची ही कारवाई त्या नऊ ठिकाणांवर केली आहे जिथून भारतावर हल्ल्याची योजना आखली जात होती. सरकारने स्पष्ट केले आहे की हे लक्ष्य केंद्रित, मोठे आणि वाढत्या स्वरूपाचे नसलेले ऑपरेशन आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी केंद्रांना लक्ष्य केले गेले नाही. ज्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता नाही. पहलगाममध्ये झालेल्या बर्बर दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या झाली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 07, 2025 6:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Operation Sindoor Ind Vs Pak : 15 दिवसांपूर्वी आया बहिणींचं कुंकू पुसलं, ऑपरेशन सिंदूर ऐकून पुण्याच्या जगदाळे काकू म्हणाल्या, मोदींना आमची जाणीव