Palghar News : आधी कॉलर पकडली मग ठोश्याबुक्यांनी मारहाण, ग्रामपंचायत कार्यालयात तूफान राडा, घटनेचा VIDEO

Last Updated:

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

Palghar News : राहुल पाटील, प्रतिनिधी, पालघर :  पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ग्रामपंचायत मधील लिपिक आणि उपसरपंचामध्ये हाणामारीची घटना घडली आहे.या हाणामारीमागच कारण समोर आलं नाही आहे. मात्र या घटनेने खळबळ माजली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर आज काही कामानिमित्त उपसरपंच शुभम वडे हे बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. या दरम्यान उपसरपंच शुभम वडे यांची ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक संकेत सावंत याच्यासोबत किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. सूरूवातीला दोघांमध्ये शाब्दीक वाद सूरू होता.त्यानंतर या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.
शुभम वडे आणि संकेत सावंत या दोघांनी एकमेकांची कॉलर पकडली आणि हाणामारी करण्यास सूरूवात केली. या हाणामारी दरम्यान दोघांनी एकमेकांना ठोश्याबुक्क्यांनी देखील मारहाण केली होती.या दरम्यान काही लोकांनी देखील या मारहाणीत उडी घेतली होती. अख्खा ऑफिसभर हा सगळा राडा सूरू होता.ग्रामपंचायत कमी पण कुस्तीचा आखाडा वाटत होता.
advertisement
या घटनेची माहिती इतर महिला आणि कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी बाहेर येऊन संपूर्ण घटना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा वाद मिटला आहे. या राड्याचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकरणी अद्याप तरी कोणतीही पोलीस तक्रार झाल्याची माहिती समोर आली नाही आहे. पण या घटनेने ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन होते आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar News : आधी कॉलर पकडली मग ठोश्याबुक्यांनी मारहाण, ग्रामपंचायत कार्यालयात तूफान राडा, घटनेचा VIDEO
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement