Rohit Sharma : 2 महिन्यांपूर्वीच सगळं ठरलं, रोहितला हटवून गिलला का मिळाली कॅप्टन्सी? गंभीर-आगरकरचा प्लान फुटला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
Rohit Sharma रोहित शर्माला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून शुभमन गिलला ही जबाबदारी का देण्यात आली? असा प्रश्न असंख्य भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आला असेल.
मुंबई : रोहित शर्माला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून शुभमन गिलला ही जबाबदारी का देण्यात आली? असा प्रश्न असंख्य भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आला असेल. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मनात असं काय चाललं होतं? ज्यामुळे त्यांनी एवढा कठोर निर्णय घेतला? टेलिग्राफने दिलेल्या वृत्तामध्ये या सगळ्या घटनाक्रमाबद्दल महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. रोहित शर्माला या निर्णयाबाबत अचानक माहिती देण्यात आली नव्हती. तर गिलला तो वनडे टीमचा कर्णधार होणार आहे, हे दोन महिने आधीच सांगण्यात आलं होतं.
इंग्लंडमधील यशाबद्दल गिलला बक्षीस
गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे प्रशिक्षक आणि निवड समितीचा वनडे क्रिकेटसाठी गिलकडे नेतृत्व द्यायचा विश्वास आणखी बळकट झाला. टेस्ट कॅप्टन म्हणून आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये गिलने ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंडमध्ये झालेल्या या सीरिजमध्ये भारताने 2-2 ने बरोबरी केली, त्यामुळे आगरकर आणि गंभीरने वनडे क्रिकेटसाठी गिलला कर्णधार करण्याची योजना आखली. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दोघांनीही बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांकडून याबाबत मंजुरी मिळवली.
advertisement
रोहितला आधीच कल्पना दिली
रोहितला या निर्णयाबाबत आधीच कल्पना दिली गेली होती. तसंच 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट आणि रोहित या दोन्ही दिग्गजांना स्थान देणं कठीण आहे. निवड समिती 2027 च्या वर्ल्ड कपसाठीचा रोडमॅप तयार करत आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराट-रोहितला पुन्हा संधी मिळेल का? याबाबतही सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी 3 वनडे मॅच खेळणार आहे, यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धही 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. मागच्या 7 महिन्यांपासून विराट आणि रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत, त्यामुळे दोघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार आहेत का? याबाबतही साशंकता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत रोहित 40 वर्षांचा होईल, त्यामुळे निवड समितीच्या प्लानमध्ये रोहित कधीच नव्हता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 10:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 2 महिन्यांपूर्वीच सगळं ठरलं, रोहितला हटवून गिलला का मिळाली कॅप्टन्सी? गंभीर-आगरकरचा प्लान फुटला